Animal Disease : मूत्रसंस्थचे कार्य शरीरात तयार होणारे अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्ये रक्ताबाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जित करण्याचे काम मूत्रसंस्था करत असते, परंतु शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये आणि मूत्रसंस्थातील अतिरिक्त ताण पडल्यामुळे या काही कारणामुळे मूत्रसंस्थातेत बिघाड झाल्यास मुतखडा (Kidnye Stone) होऊन मूत्रविसर्जित करण्यास अडथळा होऊ शकतो.
मुतखडा म्हणजे काय?
मूत्रसंस्थेमधील मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय, मूत्रनलिकामध्ये (Animal Disease) चाऱ्यातील अतिरिक्त अपायकारक द्रव्ये आणि शरीरातील अपायकारक खनिजद्रव्ये यांच्या संयोगाने एकाच ठिकाणी साचत राहिल्यामुळे मुतखडे तयार होतात. यांच्या आकारामुळे आणि मूत्रसंसंस्थेतील स्थानामुळे अडथळा निर्माण होतो.
मुतखडा होण्याची कारणे?
- मुतखडा हा प्रामुख्याने वयस्क नर पशुंमध्ये आढळतो त्यामध्ये बोकड, मेंढा, गुरे, रेडा यांचा समावेश होतो.
- नर पशुमध्ये शरीररचना शास्त्रप्रमाणे मूत्राशयाचे नलिका लहान असल्यामुळे मुतखडा झाल्यास लघवी कमी बाहेर पडते, जास्त काळ असल्यास लघवी मुत्राशयाची पिशवीमध्ये जमा होऊन मुत्राशयाची पिशवी फुटू शकते किंवा मूत्र नलिकेला छिद्र पडू शकते.
- पशूमध्ये हा आजार प्रामुख्याने खाद्यामध्ये असलेल्या ऑक्सिलेट, इस्ट्रोजन आणि सिलिकामुळे होऊ शकतो.
- पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षारदेखील आजारास कारणीभूत ठरतात.
- जनावरांमध्ये या आजाराची तिव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाही व शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.
आजाराची लक्षणे
- चारा कमी खाणे अथवा न खाणे.
- जनावर शांत उभे राहून श्वासोच्छवास वाढतो आणि वेदनेमुळे पोटाकडे पाहून पाय झाडते.
- लघवी होत नसल्यामुळे असहाय्य वेदनेमुळे दातांचा करकर असा आवाज करत अस्वस्थ उभे राहते.
- लघवी होण्यासाठी वारंवार जोर लावणे, मूत्रनलिका चाटणे आणि जोरात हंबरणे.
- पोटाच्या खालच्या भागाला सूज येऊन हात लावल्यास खड्डा पडणे (शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे).
- पोट सुजणे अथवा फुगणे.
- लघवीचा रंग आणि वास बदलणे.
- वरील लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकास दाखवून योग्य उपचार पद्धत अवलंब करावी.
मुतखडा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वयात नर जनावरांचे खच्चीकरण करून घेणे.
जास्त तंतुमय पदार्थ असलेला चार दिल्यास त्याच्या पचन क्रियेस जास्त पाणी लागते त्यामुळे जनावरांच्या आहारात मुबलक पाणी उपलब्ध करणे
उच्च प्रतिचा चारा देणे ज्यामध्ये धान्य कमी असणे.
- डॉ. सय्यद मोहम्मद अली, पशु वैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई