Agriculture News : सध्या शेती हंगाम सुरु असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. यावेळी पशुधनाचे बाजारभाव तेजीत असल्याचे चित्र आहे. मात्र अशावेळी शेतकऱ्यांकडे शेतमाल आलेला नसल्याने खरेदी होत नाही. एखाद्यावेळी विक्री होईल, मात्र खरेदीसाठी आर्थिक गणिते जुळत नाहीत. सद्यस्थितीत पशुधनाच्या बाजारभावात काय अपडेट आहे, ते पाहुयात...
सांगली बाजार म्हशीला सरासरी 60 हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर ठाणे बाजारात 80 हजार आणि हायब्रीड म्हशीला 01 लाख रुपयांचा दर मिळाला. तर 31 ऑगस्ट च्या बाजारभावानुसार पुणे बाजारात नंबर एकच्या म्हशीला 45 हजार रुपये दर मिळाला. एकूणच लोकल म्हशीला चांगला बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
तर गाईला सांगली बाजारात 60 हजार रुपये सरासरी दर, तर ठाणे बाजारात लोकल गाईला 40 हजार रुपये, तर हायब्रीड गाईला 60 हजार रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात 31 ऑगस्ट रोजी नंबर एकच्या गाईला 30 हजार रुपयांचा दर मिळाला.
कालवडीचा बाजार भाव पाहिला असता ठाणे बाजारात लोकल कालवडीला 13 हजार रुपये, तर हायब्रीड कालवडीला 20 हजार रुपये दर मिळतोय. बैल बाजार पाहिला तर पुणे बाजारात नंबर एकच्या बैलाला 30 तीस हजार रुपये, अमरावती बाजारात जवळपास 52 हजार 600 रुपये आणि बुलढाणा बाजारात 17 हजार 500 असा दर मिळतो आहे.
बकऱ्याचे बाजार भाव पाहिल्यास ठाणे बाजारात सरासरी 04 हजार 500 रुपये, अमरावती बाजारात 3650 रुपये, बुलढाणा बाजारात 7500 रुपये तर ठाणे बाजारात सरासरी 04 हजार 500 रुपयांचा दर मिळतो आहे. तर बोकडाला सांगली बाजारात 4500 रुपये, बुलढाणा बाजारात 7500 दर मिळतोय.