Join us

Animal Husbandry : पशुपालनाचे फायदे काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 7:51 PM

Animal Husbandry : अनेक शेतकरी शेतीकडे कमी आणि पशुपालनाकडे (Cattle Farming) अधिक लक्ष देऊन आर्थिक उत्पन्न मिळवत असतात.

Cattle Farming : आज शेतीसोबत पशुपालन (Animal Husbandry) देखील केले जाते. शेतीला आर्थिक मदत व्हावी, शेतीला जोडधंदा व्हावा, या हेतूने पशुपालन केले जाते. अनेक शेतकरी शेतीकडे कमी आणि पशुपालनाकडे अधिक लक्ष देऊन आर्थिक उत्पन्न मिळवत असतात. शिवाय पशुपालनातून Cattle Farming) इतरही अनेक फायदे शेतकऱ्यांना होतात, हेच या लेखातून जाणून घेऊयात.... 

आज प्रत्येक शेतकऱ्याच्या (Milk farmer) घरी पशुधन पाहायला मिळते. एक गाय, किंवा बैलजोडी, नाहीतर एक दोन शेळ्या, कोंबड्या आदी दिसून येतात. या सगळ्यांपासूनच काहींना काही मिळत असते. मग ते दुधाच्या रूपात असेल, अंड्याच्या रूपात असेल, किंवा खताच्या रूपात असेल. या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. शिवाय शेतीतही याची मदत होत असते. 

दूध उत्पादन : पशुपालनातून प्रामुख्याने दूध उत्पादन मिळत असते. यात असंख्य शेतकरी दूध व्यवसाय (Milk Business) करत असतात. त्यामुळे राज्यात दूध व्यवसायातून लाखोंची उलाढाल होत असते. शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पशुपालनामध्ये गाय, शेळी, मेंढीपासून दूध उत्पादन मिळत असते. त्यामुळे पशुपालनातील हा महत्वाचा फायदा सांगता येईल. 

मांस, अंडी उत्पादन : पशुपालन हे शतकानुशतके अन्न उत्पादनाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. कुक्कुट, शेळीपालनातून मांस, दूध, अंडी यांचे उत्पादन होत असते. आज कुक्कुटपालन आणि शेळी पालनातून अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी उद्योग उभारला आहे. या उत्पादनांचा मानवी आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. शिवाय पशुपालनातून चामडे, लोकर, खत आणि विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर उपउत्पादने तयार होतात. 

खते उत्पादन : जनावरांच्या खतामुळे माती समृद्ध होते आणि पीक उत्पादन वाढते. एकात्मिक पशुपालन पोषक तत्वांचा पुनर्वापर करून आणि मातीचे आरोग्य सुधारून पीक शेतीला पूरक ठरू शकते. गायी, बैलांच्या शेणाचा वापर, कोंबड्यां, शेळ्यांच्या मल-मूत्राचा वापर खत म्हणून वापरू शकतो... यासह सेंद्रिय शेतीला चालना मिळू शकते.  

हेही वाचा : Animal Care In Winter : हिवाळ्यात 'अशी' घ्या दुभत्या जनावरांची काळजी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसायगाय