Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Cold weather, how to protect animals from cold Know in detail  | Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Care Tips For livestock : थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात, ते पाहुयात.... 

Care Tips For livestock : थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात, ते पाहुयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Care Tips For livestock : थंडीचा कडाका (Cold Weather) खूपच वाढला असून यामुळे जनावरांना काळजी घेणे महत्वाचे आहे. जनावराना रात्री गोठ्यात ठेवावे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठा कोरडा ठेवावा. लहान करडे/ कोकरे / वासरे यांचे सध्याच्या थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेले जनावरांचीही (Care Tips For livestock) काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात, ते पाहुयात.... 

  • जनावरांच्या गोठ्यांना बारदान / शेडनेटचे पडदे लावावेत. 
  • गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० व्हॅटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावीत. 
  • शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. 
  • गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत / कडबा / गोणपाट यांची बिछायत टाकावी. 
  • गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यासाठी दर ८ ते १०० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा. 
  • थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे. 
  • विशेषतः गाभण गायी-म्हशींची जास्त काळजी घ्यावी. 
  • जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड/ सरळी पेंड यांचा वापर वाढवावा. 
  • शक्य असल्यास बायपास पेंड/ सरळी पेंड यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा. 
  • क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा. 
  • चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे, जेणेकरून गवतावर दव नसेल. 
  • गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी 

Web Title: Latest News Cold weather, how to protect animals from cold Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.