Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dairy And Poultry : दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनात 'या' तीन गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर   

Dairy And Poultry : दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनात 'या' तीन गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर   

Latest News Dairy And Poultry management Don't ignore three things in dairy and poultry farming, read in detail    | Dairy And Poultry : दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनात 'या' तीन गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर   

Dairy And Poultry : दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनात 'या' तीन गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर   

Dairy And Poultry : दूध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, या दोन्ही व्यवसायामध्ये व्यवस्थापन करणे सारखंच असते, याबाबतच आज लेखाद्वारे पाहुयात....  (three management practices that are common in dairy and poultry farming)

Dairy And Poultry : दूध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, या दोन्ही व्यवसायामध्ये व्यवस्थापन करणे सारखंच असते, याबाबतच आज लेखाद्वारे पाहुयात....  (three management practices that are common in dairy and poultry farming)

शेअर :

Join us
Join usNext

Dairy And Poultry : आजच्या घडीला शेतीबरोबर असंख्य शेतकरी शेती पूरक (farming Business) व्यवसाय करत आहेत. यात दूध व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालन असेल, हे दोन्ही व्यवसाय फायदेशीर असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रचलित आहेत. या दोन्हीही व्यवसायातील शेतकरी व्यवसाय विकसित करण्यासाठी मेहनत घेत असतात. शिवाय या दोन्ही व्यवसायामध्ये व्यवस्थापन करणे सारखंच असते, याबाबतच आज लेखाद्वारे पाहुयात.... 

आपण पाहतो की असंख्य शेतकरी दूध व्यवसाय (Dairy Business), कुक्कुटपालन (Poultry Farming) करत असतात. मात्र अनेकदा योग्य निवारा म्हणजेच पशुधनासाठी योग्य निवारा असणे आवश्यक असते. तसेच कुक्कुटपालनासाठी देखील स्वयंपूर्ण निवारा असायला हवा. तसेच उत्तम दूध उत्पादनासाठी पशुधनाला वेळेवर योग्य खुराक मिळणे आवश्यक आहे. तसेच कुक्कुटपालनापासून मिळणाऱ्या उत्पादनसाठी देखील चांगल्या आहाराची आवश्यकता असते. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट रोगांना प्रतिबंध करणे. 

योग्य निवारा 

पशुधनाला पाऊस, वारा, जास्त ओलावा यापासून संरक्षणासाठी उत्तम निवारा असणे आवश्यक असते. जेणेकरून दूध व्यवसाय वाढीसाठी मदत होईल. शिवाय निवारा शेड किंवा गोठा हवेशीर असायला हवा. तसेच कुक्कुट पालनातही सोयीस्कर निवारा खूप महत्वाची भूमिका बजावत असते. पक्ष्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रशस्त वातावरण प्रदान करणे त्यांच्या परिणामकारकतेसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे. पक्ष्यांच्या चांगल्या वाढीसाठी योग्य वेळेसह योग्य प्रकाश व्यवस्था राखणे आवश्यक आहे. निवारा योग्य प्रकारे डिझाइन केलेला असावा आणि त्यांच्या हालचालीसाठी पुरेशी जागा दिली पाहिजे.


स्वच्छ आणि पौष्टिक आहाराची तरतूद 
उत्तम दूध उत्पादनासाठी पशुधनाचा आहार संतुलित असणे आवश्यक असते. यात हिरवा चारा, विविध पिकांचा भरडा तसेच गरजेनुसार सुका चारा आवश्यक असतो. तर पोल्ट्री वाढ आणि उत्पादनासाठी योग्य प्रमाणात योग्य पोषण देणे हा सर्वात आवश्यक भाग आहे. शेतकऱ्यांनी पक्ष्यांच्या विशिष्ट जाती, वय, टप्पा आणि वजन यानुसार उच्च दर्जाचा, संतुलित आहार देणे आवश्यक असते. 

आरोग्याची काळजी 

दूध व्यवसायामध्ये हा मुद्दा महत्वाचा ठरतो. पशुधनाचे आरोग्य बिघडल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. पशुधनाची नियमितपणे पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आजारी जनावरांना वेळेवर उपचार करावे. प्रामुख्याने कासदाह, क्षय व विषमज्वर अशा आजारांची बाधित झालेल्या जनावरांचे दूध वापरू नयेत. तसेच बाधित जनावरांची व्यवस्था स्वतंत्र ठिकाणी करावी.

तर कुक्कुटपालन व्यवसायामध्ये वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यक कृतींची अंमलबजावणी करणे ही पक्ष्यांची एकूण कार्यक्षमता साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका असते. लसीकरणाचे योग्य वेळापत्रक पाळणे आणि त्यांना आरोग्य पूरक आहार देणे, रोगाची परिस्थिती टाळण्यास मदत करते. विश्लेषणासाठी पक्ष्यांचा मृत्यू दर, खाद्य आणि पाण्याच्या वापराची पातळी, उबवणुकीचे दर आणि रोगाचा मागोवा घेणे आवश्यक असते. 
 

Web Title: Latest News Dairy And Poultry management Don't ignore three things in dairy and poultry farming, read in detail   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.