Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेतकऱ्यांनो! पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवायचंय, असा करा अर्ज 

शेतकऱ्यांनो! पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवायचंय, असा करा अर्ज 

latest news Dairy development project for empowerment of tribal brothers, see process | शेतकऱ्यांनो! पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवायचंय, असा करा अर्ज 

शेतकऱ्यांनो! पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवायचंय, असा करा अर्ज 

आदिवासी समाज बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  

आदिवासी समाज बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  

शेअर :

Join us
Join usNext

आदिवासी समाज बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  राबविण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून दुग्ध विकास करण्यासाठी वेगवगेळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. 
                                                        
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील सटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने अंतर्गत संयुक्तदायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवण्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संयुक्तदायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबवण्याकरिता अर्थसाह्य करणारी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 5 ते 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कळवण यांच्या कार्यक्षेत्रातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात वाटप व स्वीकारण्यात येणार आहेत. मुदतीनंतर अर्जांचे वाटप व स्वीकार केला जाणार नाही, असे ही डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

ही आहेत अर्जासह सादर करावयाची कागदपत्रे…
लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा
जातीचा दाखला
आधार कार्ड, रेशन कार्ड
लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकची झेरॉक्स
अलीकडील एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला/ बी.पी.एल. दाखला
अपंग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास)
मतदान किंवा पॅनकार्ड
दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
यापूर्वी सदर योजनेचा लाभ या कार्यालयाकडून किंवा अन्य शासकीय विभागाकडून घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र
ग्रामसभेचा ठराव गट नोंदणी प्रमाणपत्र

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: latest news Dairy development project for empowerment of tribal brothers, see process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.