Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेतकऱ्यांनो, ऑनलाइन गाय, म्हैस खरेदी करताय, थांबा ही बातमी वाचा!

शेतकऱ्यांनो, ऑनलाइन गाय, म्हैस खरेदी करताय, थांबा ही बातमी वाचा!

Latest News Farmers, be careful while buying cow, buffalo online | शेतकऱ्यांनो, ऑनलाइन गाय, म्हैस खरेदी करताय, थांबा ही बातमी वाचा!

शेतकऱ्यांनो, ऑनलाइन गाय, म्हैस खरेदी करताय, थांबा ही बातमी वाचा!

भूमिहीन असलेल्या शेतकऱ्याने फेसबुकवरील गाय विक्रीची जाहिरात पाहत गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला अन् फसला.

भूमिहीन असलेल्या शेतकऱ्याने फेसबुकवरील गाय विक्रीची जाहिरात पाहत गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला अन् फसला.

शेअर :

Join us
Join usNext

आजच्या मोबाइल क्रांतीच्या युगात अनेक जण सोशल मीडियाचा वापर करीत असून, यातून अनेकांनी फसवणुकीचा बाजार मांडला आहे. मूल येवील भूमिहीन असलेल्या शेतकऱ्याने फेसबुकवरील गाय विक्रीची जाहिरात पाहत गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला अन् फसला. यात खरेदी केलेली गाय तर मिळालीच नाही, उलट 18 हजारांनी फसवणूक झाली. हा प्रकार 07 फेब्रुवारीला उघडकीस आला.

फसगत झालेल्या शेतकऱ्याचे नाव अविनाश पुरुषोत्तम बोरकर, असे असून तो इंदिरानगर वॉर्ड मूल येथील रहिवासी आहे. घरी शेती नसली तरी दोन गायी आहेत. यातून तो उदरनिर्वाहसाठी दुधाचा व्यवसाय करतो. अविनाशने फेसबुकवरील अशोक शर्मा डेरी फार्म, जयपूर, राजस्थान यांची गाय विक्रीची जाहिरात पाहिली आणि अन् व्यवसाय वाढविण्याकरिता गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. जाहिरातीमधील संपर्क क्रमांकावरून संपर्क साधत गायीची किंमत विचारली. 40 हजार रुपये किंमत असलेल्या गायीचा तडजोडीनंतर 34 हजारांत सौदा पक्का झाला, तीन हजार रुपये गुगल पेने पाठवून त्यांनी गाय बुक केली.

06 फेब्रुवारीला गाय मूलच्या दिशेने निघाली, असा संदेश बोरकर यांना दिला गेला. 07 फेब्रुवारीला गाय मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असून, पोलिस चौकीचे नाव सांगून नऊ हजार पाचशे रुपये मागविले. परत डेअरी फार्मकडून फोन आला. नऊ हजार रुपये वेगळे व पाचशे रुपये वेगळे पाठवा, म्हणून बोरकर यांनी पैसे पाठविण्यास असमर्थता दाखवत पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी पैसे न देता पुन्हा पाच हजार पाचशे रुपयांची मागणी केली. भोळ्या शेतकऱ्याने पाच हजार पाचशे रुपये पुन्हा पाठवले. त्यानंतर फोन आला की, चार हजार रूपये पुन्हा पाठवावे लागतील, तेव्हाच गाय मिळेल. असे वारंवार फोन करून एकूण 18 हजार रुपये आरोपीने बोरकर यांच्याकडून ऑनलाइन मागविले. मात्र, अजूनही गाय मूलमध्ये पोहोचलीच नसल्याने आपली फसगत झाल्याचे बोरकर यांच्या लक्षात आले.

पोलिसांत तक्रार दाखल 
फसगत झाल्याचे लक्षात येताच बोरकर यांनी मूल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, तेथील पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलचे असल्याने त्यांना सायबर चौकीत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ठाणेदार सुमित परतेकी तिथे उपस्थित नव्हते. त्यांना याबाबत भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News Farmers, be careful while buying cow, buffalo online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.