शेतकरीशेती सोबतचपशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर करत असतात. मात्र अनेकदा पशुसंदर्भातील वंध्यत्व समस्या आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत शेतकरी अनभिज्ञ असतात. त्यामुळे नेमकं काय करायचं असा प्रश्न उभा राहतो. यासाठी नाशिक जिल्हा परिषद पशु संवर्धन विभागाकडून याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आज महाराष्ट्रात पशुपालकांची संख्या मोठी आहे. अशावेळी अनेक शेतकरी पशुपालन करण्याच्या उद्देशाने पशुसंख्येत वाढ करत असतात. मात्र पशूंमधील वंध्यत्वाबाबत फारशी माहिती नसते. अशावेळी गायी / म्हशी नियमितपणे व्याल्यासच ती फायदेशीर ठरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी /म्हशी वारंवार उलटणे, हया समस्यामुळे, जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो.
पशूंच्या वंध्यत्वाबाबत महत्वाचे....
जनावरातील वांझपणाची कारणे माहित नसणेवांझपणा दोन प्रकारचा असतो.कायमचा वांझपणाकायमचा वांझपणा खालील कारणाने असतो.अनुवंशिक गुणगर्भाशयाची अपुरी वाढ, स्त्रीबीजांडाची वाढ न होणे, स्त्रीबीजात दोष, एकाच वेळी दोन भिन्न लिंगाची जुळी वासरे होणे.तात्पुरता वांझपणातात्पुरता वांझपणा निदानानंतर योग्य उपचाराने बरा होतो. याकरीता शेतकऱ्याला गायी / म्हशीतील माज ओळखता आला पाहिजे. म्हणजे गायी / म्हशीतील कृत्रीम रेतनाची योग्य वेळ कळू शकेल. शेतकऱ्याने आपल्या जनावरांच्या खालीलप्रमाणे नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
जनावर माजावर आलेली तारीखमाज किती दिवस टिकलाकृत्रिम रेतनाची तारीखजनावर उलटलेले असेल तर जनावराची पूर्वी माजावर आल्याची तारीख
जनावरातील माज कसा ओळखावा ?
अनेकदा माजावर येणारी गाय शेपटी उडवते, अस्थिर असते व वारंवार लघवी करते. योनी लालसर व सुजलेली दिसते. योनिमार्गे चिकट द्रव (सोट) पाझरतो. (अंडयाच्या पांढऱ्या बलकासारखा ) दुसऱ्या गायीवर उडते. दुसऱ्या जनावरासोबत लगट करते. मुका माज दाखविणारे जनावर माजावर येऊन गेले तरी समजत नाही. जनावर माजावर येऊन गेल्यानंतर मांडीवर / योनीच्या खालच्या बाजूस स्त्रावाचे पापुद्रे आढळतात.
सांसर्गिक लैंगिक रोगामुळे : लाळ खुरकत, ब्रुसोल्लोसीस (सांसर्गिक गर्भपात ) रोगामुळे वांझपणा येतो.व्याल्यानंतर न घेतलेली काळजी : गाय / म्हशी व्यालानंतर तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येईपर्यंत काळजी न घेतल्यास जंतू संसर्ग होतो व गाईला / म्हशीला गर्भाशयाचे विकार जडतात.आहारातील दोष : अधिक दुध उत्पादनाच्या दृष्टीने गायीस अधिक आहार दिला जातो. त्याचे परिणाम गाय लठ्ठ होऊन गायीची प्रजनन क्षमता कमी होते. गायीच्या आहारातील अ,ब,क,ड, ई या जिवनसत्वाचा व तांबे, लोह व कॅल्शियम या धाराच्या अभावामुळे / कमतरतेमुळे गायीमध्ये वांझपणा येतो
जनावरांची घ्यावयाची काळजी
गाय / म्हशी व्यालानंतर तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येईपर्यंत काळजी न घेतल्यास जंतू संसर्ग होतो व गाईला / म्हशीला गर्भाशयाचे विकार जडतात. आहारातील दोष अधिक दुध उत्पादनाच्या दृष्टीने गायीस अधिक आहार दिला जातो. त्याचे परिणाम गाय लठ्ठ होऊन गायीची प्रजनन क्षमता कमी होते. गायीच्या आहारातील अ,ब,क,ड, ई या जिवनसत्वाचा व तांबे, लोह व कॅल्शियम या धाराच्या अभावामुळे / कमतरतेमुळे गायीमध्ये वांझपणा येतो. मोड आलेली कडधान्ये व ३० ते ६० ग्रॅम खनिज मिश्रण स्वरूपात द्यावे २) चाटण वीट गव्हाणीत गुरांपुढे टांगून ठेवावी. तसेच ३० ग्रॅम (मुठभर) जिवनसत्वयुक्त क्षारमिश्रण प्रत्येक जनावरास दररोज द्या. तसेच कधी जनावर तपासताना त्याच्या शेणाच्या पिशवीतून रक्तस्त्राव झाला तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. तपासणीनंतर तो आपोआप थांबतो व गायी / म्हशीतील प्रजनन संस्थेस काहीही अपाय होत नाही, असे आवाहन पशू संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
स्रोत : जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग, नाशिक