Join us

गाय-म्हैस सावलीत बांधा, अन्यथा दूध आणि रोगप्रतिकारशक्तीवर होईल परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 5:30 PM

वाढत्या उष्ण हवामानामुळे दुभत्या पशुधनाचे दूध घटण्याबरोबरच उत्पादन रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची भीती आहे.

धाराशिव : यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, सध्या तापमान ३७ अंशापर्यंत जाऊन पोहोचले आहे. वाढत्या उष्ण हवामानामुळे दुभत्या पशुधनाचे दूध घटण्याबरोबरच उत्पादन रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुधनाची अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात जनावारांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पशुधनास पाजणे टाळावे, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे.

काही दिवसांपासून उष्णता वाढली असून, आबालवृद्ध घामाघूम होत आहेत. मनुष्याप्रमाणेच पशुधनाच्या आरोग्यावरदेखील उच्च तापमानाचा परिणाम होत असतो. त्यामुळे लकांनी आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घेणे गये आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात २०१९ च्या जनगननेनुसार गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेढधांसह १ लाख २४ हजार ८० पशुधन आहे. दुधाळ पशुधनाची संख्या ७४ हजार ४२७ आहे या पशुधनाची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पशुपालकांनी पशुधनात चरण्यासाठी कडक उन्हात सोडू नये. लोखंडी हौदामध्ये गरम असलेले पाणी पाजने, दावणीला दाटीवाटीने जनाबारे बांधणे टाळावे. मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरणाच्या ठिकाणी करू नये. पशुधन थंड ठिकाणी दावणीला बांधावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

या भागात दुधव्यवसाय अधिक असल्याने पशुधनाची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, या काळ पशुधनाची भूक मंदावते. कोरडा चारा खाल्ल्याने हालचाल शरीराचे तामपान वाढल्याने जोरजोरात श्वास घेतला जातो. भरपूर घामही येतो. दूध उत्पादन कमी होण्याबरोबरच प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे उन्हात पशुधनाची काळजी घ्यायला हवी. 

-डॉ. प्रदीप बळवे, प्रभारी पशुधन विकास अधिकारी विस्तार, पं.स. भूम

उन्हाळ्यात अशी घ्या काळजीजनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी या वेळेतच चरण्यासाठी सोडावे, हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला पांढरा चुना अथवा रंग लावावा. त्यावर पालापाचोळा टाकावा, यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होईल गोठयाच्या सभोवताली झाडी असावी. दुपारी गोठ्याभोवती बारदाना, शेडनेट लावावे. जनावारांना मोठ्या प्रमाणात थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतीमशागतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. पाण्यात आवश्यतेनुसार पाण्याचा वापर करावा. थंड वातावरणात चारा टाकावा, वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे, म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घाम ग्रंथीच्या कमी संख्येमुळे गायीपेक्षा उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीतापमानहवामानगाय