Join us

पशुपालकांनी देशी गायी सोडून संकरित गाय पालन का सुरू केलंय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 1:50 PM

त्यामुळे मोजक्याच पशुपालकांकडे आता देशी गायी दिसून येत असल्याने  चिंतेची बाब ठरत आहे. 

ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान दहा जनावरे होती, त्यात ग्रामीण गायींची संख्या पाचच्यावर असे. मात्र मागील काही वर्षांपासून देशी गायींची संख्या घटत आहे. दूध व्यवसायासाठी पशुपालक संकरित गाय पालनावर भर देत आहेत. त्यामुळे मोजक्याच पशुपालकांकडे आता देशी गायी दिसून येत असल्याने  चिंतेची बाब ठरत आहे. 

पशुपालकांसह व्यवसायासाठी गायी म्हशीची संख्या वाढत आहे. मात्र यात देशापेक्षा संकरित जनावरांची संख्या अधिक आहे. एकीकडे देशी गाय दुर्मीळ होत असली तरी शेतकऱ्यांसाठी ती जीवनदायिनी आहे. मात्र, आता संकरित गायीकडे आर्थिकदृष्ट्या पाहिले जाते. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पिढीला गावरान गायी चित्रावर पाहावी लागते की काय, अशी चिंता वयोवृद्ध मंडळीला लागली आहे. गावरान गायपासून दूध, दही, ताक, तूप कुटुंबाला मुबलक मिळत होते.

संकरित गाय देते १५-२० लीटर दूध

संकरित गाय दोनवेळा किमान १५ ते २० लिटर दूध देते. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अधिक मिळत असल्याने संकरित गायीची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे. संकरित गायीचे दररोजचे दूध ७०० ते ८०० रुपयांचे मिळते, तर संकरित गाईचे तूप बाजारात ५०० रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे.

अशी आहे समस्या

गायीपासून कालवड झाली तर तिचा सांभाळ किया विक्री व गोहे आले तर शेतात नांगराला जुंपण्यासाठी तयार करीत होते. गावरान बैलाला शेतीच्या कामासाठी बाजारात आजही चांगली मागणी आहे. शेतीच्या कामासाठी संकरित बैलजोड ५० हजार रुपये, तर गावरान बैलजोडीला आजही बाजारात लाखाची किमत मोजावी लागत आहे. गावरान गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार मिळतो; परंतु कालांतराने महागाई वाढली, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

गावरान गायीसाठी पेंड, सुग्रास, चारा यावर होणारा खर्च व त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होतो. विविध कारणांमुळे शेतकऱ्यांच्या दावणीला दिवसेंदिवस गावरान गायीची संख्या कमी होत आहे. संकरित गाय दूध देते. मात्र, त्या दुधाची विक्री दूध डेअरीवर होते. बहुतांशी शेतकरी हे उत्पन्न वाढीसाठी संकरित गायी पालन करीत आहेत. गावरान गायीचे दूध घरीच विक्री होते, गावरान गायीचे तूप हे लहान मुलांसह वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. - विठ्ठल वसू, शेतकरी

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

 

टॅग्स :शेतीगायशेती क्षेत्रशेतकरी