Join us

Cowshed Cleaning : जनावरांच्या आरोग्यासाठी, उत्तम दूध उत्पादनासाठी गोठ्याची जैवसुरक्षितता, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 3:21 PM

Cowshed Cleaning : आपल्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास गोठ्यात स्वच्छता (Dairy Management) असणे महत्वाचे असते.

Dairy Management : आपल्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास गोठ्यात स्वच्छता (Dairy Management) असणे महत्वाचे असते. जेणेकरून जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. शिवाय जनावरांचे आरोग्यही उत्तम राहते. आणि दूध उत्पादनही चांगले मिळण्यास मदत होते. आज गोठ्याची जैवसुरक्षिततेचे महत्व या लेखातून समजून घेऊया.. 

जैवसुरक्षितता (Cowshed Cleaning) म्हणजेच जनावरे, गोठा, भेट देणारे लोक, वापरत असलेली उपकरणे, भांड्यांचे निर्जंतुकीकरण, जनावरांमध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे दूध उत्पादनात घट येते. जनावरे व पर्यायाने दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते. गोठ्यामध्ये येणारे आगंतुक. प्राणी, पक्षी रोग पसरविण्याचे काम करतात. 

गोठ्याला भेट देणाऱ्या लोकांचे हात व पाय किंवा बूट निर्जंतुकीकरण करून आत सोडल्यास रोगांचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विविध प्रकारचे विषाणू जीवाणू, बुरशी आणि इतर अपायकारक सूक्ष्मजीव अगोदरच दुधाचा ताण असलेल्या दुभत्या जनावरांना आजारी पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यावर वेळेत नियंत्रण केल्यास जनावरे आजारी पडणार नाहीत. गोठ्यात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रमाणित जंतुनाशकांची नियमित फवारणी करावी.

आता पाऊस उघडा असल्याने सकाळच्या सुमारास जनावरे बाहेर सूर्यप्रकाशात बांधावीत. गोठ्यात अनेकदा मलमूत्र साचून राहते, अशावेळी मलमूत्राचा  विल्हेवाट लावावी. संपूर्ण गोठा स्वच्छ ठेवावा. असे केल्याने गोठ्यातील माशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. पावसाळ्यात गोठ्यामध्ये खड्डे तयार होतात, हे खड्डे मुरूम टाकून सपाट करावेत. 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेती क्षेत्रशेतीगाय