Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Gay Gotha Anudan : गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

Gay Gotha Anudan : गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

Latest News gay Gotha anudan Grant of up to two lakhs 25 thousand for cowshed, see complete process | Gay Gotha Anudan : गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

Gay Gotha Anudan : गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 

Gay Gotha Anudan : यानुसार शेतकऱ्यांना गाय-म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे.

Gay Gotha Anudan : यानुसार शेतकऱ्यांना गाय-म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने गाय-म्हैस पालनासाठी (Gay Gotha Anudan) विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल.

महाराष्ट्र शासनाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Gram samrudhi Yojana) जाहीर केली. यानुसार शेतकऱ्यांना गाय-म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील पशुपालनास चालना (dairy Farming) देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. 

सदर योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळत आहे. सदर योजना पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर २२ कामे गायगोठ्याची मंजूर आहेत. यापैकी १००७ कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या ४५३ कामे सुरू आहेत. योजनेच्या माध्यमातून पशुपालनाचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी मदत मिळत आहे, अशी माहिती रोहयोचे कार्यक्रम अधिकारी चेतन हिवंज यांनी दिली.

योजनेचे फायदे काय?
आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही.
अनुदानामुळे शेतक-यांवरील आर्थिक बोजा कमी होईल.

अर्ज कसा करणार?
ऑनलाइन : सदर योजनेच्या लाभघेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
ऑफलाइन : शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागते. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो.

काय आहे गोठा योजना?
शेतकरी, पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरीत्या करता यावे. त्यांना त्यांचे संरक्षण करता यावे यासाठी गोठा योजना राबविली जात आहे.

कागदपत्रे काय?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा उतारा, आधार कार्ड, बैंक पासबुक, पशुधन असल्याचा पुरावा, जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करावी लागतात.

अनुदान किती ?

  • दोन ते सहा जनावरांचा गोठा दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण ७७ हजार १८८ रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
  • सहा ते बारा जनावरांचा गोठा सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच १ लाख ५४ हजार ३७६ रुपये दिले जातात.
  • तेरापेक्षा अधिक जनावरांसाठी: तेरापेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकाराच्या तीन पट म्हणजेच २ लाख ३१ हजार ५६४ रुपयांचे अनुदान दिले जाते.

 

कोणाला अर्ज करता येणार?
अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा. ग्रामीण भागातील पशुपालकांना सदर योजनेचा लाभ मिळत आहे. 

Web Title: Latest News gay Gotha anudan Grant of up to two lakhs 25 thousand for cowshed, see complete process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.