Goat Farming Disease : पावसाळयातील उष्ण व दमट हवामानात जंत प्रादुर्भावास (Sheli Palan) उपयुक्त असते. त्यामुळे शेळया-मेंढ्यांमध्ये पावसाळयात जंत प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. पावसाळयातील वातावरण जंताच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पावसाळयातील कोवळ्या गवताबरोबरच जंताची (Sheli Worm Disease) अंडी तसेच विविध अवस्थेतील जंत पोटात जाऊन तेथेच त्यांची वाढ होते. जाणून घेऊया शेळ्यांमधील जंत प्रादुर्भाव व त्यावरील उपाय....
गोलकुमी (Round Worm) :
- गोलकृमी साधारणपणे १ से.मी ते ३० से.मी. लांबीचे असू शकतात.
- ते शेळ्यांच्या आतडयात व पोटात आढळून येतात.
- पावसाळयामध्ये कोवळ्या गवताबरोबर जमिनीतील अंडे व अळया शेळयांच्या पोटात जाऊन तेथेच त्यांची वाढ होते.
- शेळ्यांच्या आतडयातुन व पोटातुन हे कृमी रक्ताचे शोषण करित असल्यामुळे शरिराची वाढ खुंटुन शेळया अशक्त दिसतात.
- प्रतिबंधक उपयम्हणुन दर तीन महिन्यांनी पशुवैदयकाच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना जंतनाशक औषध पाजावे.
चपटे कृमी (Fluke) -
- चपटेकृमी हे पानाच्या आकाराचे असतात.
- हे कृमी शरिरात यकृतामध्ये वाढतात म्हणुन त्यांना यकृत कृमी (Liver Fluke) असे म्हणतात.
- चपटे कृमी शेळ्यांच्या पोटात दिसून येतात. त्यांना अम्फीस्टोम तर नाकामध्ये आढळून येतात, त्यांना सिस्टोझोम असे म्हंटले जाते.
- या सर्व पर्णाकृती कृमीची वाढ तळ्याकाठी असलेल्या गवतावर व पाण्याच्या पृष्ठभागावर होते.
- असे गवत किंवा पाणी पोटात गेल्यामुळे शेळयांच्या पोटात कृमींची वाढ होते.
- यकृत कृमीमुळे पित्तवाहीनी बंद होऊन काविळीचा आजार होऊन शेळया मृत्युमुखी पडतात.
- यासाठी दलदलीच्या जागी किंवा तळ्याकाठी शेळ्यांना चारणे किंवा पाणी पाजणे टाळल्यास या कृमीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
पट्टकृमी (Tape Worm) :
- या जांतची लांबी २ ते ३ मीटर असू शकते.
- दुषित गवताद्वारे मातीतील अंडी शेळयांच्या पोटात गेल्यामुळे पोटात या जंताची वाढ होते.
- हे कृमी शेळयांच्या आतडयामध्ये असतात व हे जंत शेळ्यांचे अन्नघटक खाऊन त्यांच्या वाढीवर परिणाम करतात.
प्रतिबंधात्मक उपाय :
- सकाळी दहिवरात कुरणातील गवताच्या पानांच्या टोकावर जंताच्या आळ्या आलेल्या असतात.
- सकाळी दहिवर हटल्यानंतर स्वच्छ सुर्यप्रकाश पडल्यावर आळ्या खाली जातात.
- म्हणुन दहिवर हटल्यावर शेळ्या चरायला सोडल्यास जंतसंसर्गाचे प्रमाण कमी राहील.
- वाड्यातील लेंडीच्या ढिगाभोवती शेळया चरायला सोडू नये.
- एका रानात ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस शेळ्या चारू नयेत.
- एकदा एका रानात चारल्यानंतर अंदाजे एक महिना शक्यतो शेळ्या त्याच रानात परत नेऊ नयेत.
- शेळ्या-मेंढ्या गाई-म्हशी या जनावरांना अपायकारक असणाऱ्या जंताच्या जाती वेगवेगळ्या असतात.
- म्हणुन शेळ्या मेंढ्या चरून गेल्यानंतर तेथे इतर जनावरे सोडल्यास जंताचे जिवनचक्र थांबणे व जंतप्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
- शेळ्यांच्या लेंड्या नियमितपणे तपासाव्यात व जंतप्रादुर्भाव असेल तर त्यांच्या निर्मूलनासाठी जंत निवारक औषधोपचार करण्यात यावा.
डॉ. सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी महामंडळ, नाशिक