Goat Farming Guide : शेळी पालन (Goat Farming) व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसेच शेळयांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात (Goat Health Tips) निष्काळजीपणा दाखविल्यास कळपातील जनावरांना विविध रोगाची लागण होऊन शेळ्यांच्या मृत्युमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
अशा वेळी ताबडतोब पशुवैद्याकडून कळपातील आजारी शेळयांचे उपचार करून घेणे फायदेशीर ठरते. तसेच शेळीपालकांना साथीच्या रोगांची लक्षणे उपचार व प्रतीबंधक उपाय माहिती असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. कळप निरोगी ठेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रोगाच्या प्राथमिक अवस्थेतच आजारी शेळ्या ओळखणे (Sick Goat) अतिशयं महत्वाचे आहे.
आजारी शेळी कशी ओळखावी.
- शेळीची हालचालीसह भूक मंदावते..
- आजारी शेळ्या कळपातुन वेगळ्या राहण्याचा प्रयत्न करतात.
- लेडयांचे प्रमाण कमी होऊन त्या घट्ट किंवा पातळ होतात.
- लघवी कमी व पिवळसर असते.
- नाकपुड्या कोरडया पडतात.
- एखादयावेळी शेळी लंगडते.
- अंगावरील केस ताठ होऊन चमक नाहीशी होते.
- दुध उत्पादन कमी होते..
- शेळीच्या डोळ्यांमध्ये पाणी, वाहणे, लालसरपणा किंवा श्लेष्मा असल्यास समस्या असू शकते.
- शेळीचे नाक मऊ आणि ओले नसल्यास किंवा नाकात कोणताही स्त्राव, भेगा किंवा कोरडेपणा असल्यास समस्या असू शकते.
डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक