Join us

Goat Farming Techniques : शेळ्यांना सांसर्गिक फुफ्फुसदाह होऊ नये, म्हणून काय करावे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:51 IST

Goat Farming Techniques : शेळ्यांना (Goat Farming) होणारा सांसर्गिक फुफ्फुसदाह हा आजार जास्त पाऊस आणि कोंदट दमट हवामानाच्या प्रदेशात जास्त प्रमाणात होतो.

Goat Farming Techniques :शेळ्यांना (Goat Farming) होणारा सांसर्गिक फुफ्फुसदाह (Infectious pneumonia in goats) हा एक जिवाणूजन्य आजार आहे. हा आजार जास्त पाऊस आणि कोंदट दमट हवामानाच्या प्रदेशात जास्त प्रमाणात होतो. या आजाराची लक्षणे काय आणि प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील, याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.... 

सांसर्गिक फुप्फुसदाह (सी.सी.पी.पी.) :

  • हा रोग ज्या भागात जास्त पाऊस, कोंदत, दमट हवामान असते, अशा भागात जास्त प्रामणात आढळतो. 
  • निकृष्ट गोठा व्यवस्थापन, शेळ्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे. 
  • सकस आहाराची कमतरता, अशक्तपणा तसेच वातावरणात आद्रता असेल तसेच जंताचा प्रादुर्भाव असेल तर शेळ्यांना या रोगाची लागण फार लवकर होते.

 

लक्षणे :

  • फुप्फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अशक्त बनते.  
  • सारखा खोकला येतो, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. 
  • रोगाच्या सुरुवातीस शेळीच्या / करडांच्या नाकातुन पाणी येते. 
  • नंतर ते घट्ट होऊन नाकात शेंबुड येतो. 
  • बऱ्याच शेळ्यांना/करडांना हगवण लागते.

 

प्रतिबंधात्मक उपाय :

  • पावसाळयात थंड वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी गोठयात उष्णता घ्यावी. 
  • शेळ्यांना करडांना सकस आहार घ्यावा. 
  • शेळ्यांचे/करडांचे उत्तम व्यवस्थापन करावे. शेळ्यांचे जंतनिर्मुलन करावे.

 

- सचिन टेकाडे, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेतीशेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय