Join us

Goat Diseases : शेळ्यांमधील फऱ्या आजाराची लक्षणे आणि उपाय, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:47 IST

Goat Diseases : सर्वसामान्यपणे या रोगामध्ये फऱ्याजवळ (Goat Diseases) सुज येते. त्यामुळे या रोगास फऱ्या असे म्हणतात.

Goat Diseases  : शेळ्यांमधील फऱ्या (Distemper in goats) हा तीव्र स्वरुपाचा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लॉस्ट्रीडीयम चोव्हॉय या जीवाणुमुळे होतो. सर्वसामान्यपणे या रोगामध्ये फऱ्याजवळ (Goat Diseases) सुज येते. त्यामुळे या रोगास फऱ्या असे म्हणतात.

या रोगाचे जिवाणु मातीत वास्तव्य करतात. हे जिवाणु विष तयार करतात व रक्ताद्वारे हे विष शरीरात पसरून स्नायूमध्ये साठले जाते व जनावरांना या रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग संसर्गिक असून, या रोगाचे जिवाणु संसर्ग झालेले खादय, पाणी, चारा व जखमा इ. माध्यमातुन निरोगी जनावरे बाधित करतात.

लक्षणे काय दिसतात? 

  • या रोगात पायाच्या वरच्या भागात किंवा खांदयावर सुज येणे, पाय लंगडणे व त्या भागास दाबल्यास चरचर असा आवाज येतो.
  • बाधित भागाची कातड़ी निळसर होते, गरम लागते, वेदना होतात व कांही दिवसांनंतर तो भाग वेदनाविरहीत होतो. 
  • जखम फुटल्यास त्यामधून काळसर द्रव बाहेर येतो. 
  • त्यात बुडबुड्या येणारा हायड्रोजन सल्फाईड वायु तयार होऊन त्यास खराब वास येतो.
  • या रोगात उच्च ताप असतो व जनावरांचे खाणे-पिणे थांबते.

 

रोग निदान कसे होते? 

बाहय लक्षणांवरून खात्रीपुर्वक निदान होऊ शकते. तसेच बाधित जनावरांच्या पायाचा मांसाचा नमुना प्रयोगशाळेत पशुवैदयकाच्या सहाय्याने परिक्षणासाठी पाठवावा व रोगनिदान करून घ्यावे.

हे उपचार करा 

पशुवैदयकाच्या सहाय्याने त्वरीत उपचार करून घ्यावा. सुरूवातीस उपचार केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु उपचारास विलंब झाल्यास मृत्यु होण्याची शक्यता जास्त असते.

हे प्रतिबंधक उपाय : 

  • आजारी शेळ्या निरोगी शेळ्यामधून वेगळया कराव्यात.
  • मृत शेळ्यांची योग्य विल्हेवाट लावावी (जमिनीत पुरून किंवा जाळून).
  • जनावरांना एकाच ठिकाणी वारंवार चरण्यास पाठवू नये.

 

लसीकरण :

ज्या भागात वारंवार या रोगाची साथ येते, त्या भागात शेळी पालकांनी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोगप्रतिबंधक लस टोचून घेणे फायदयाचे ठरते.

टॅग्स :शेळीपालनशेती क्षेत्रशेतीदुग्धव्यवसाय