Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming Technique : शेळी पालनासाठी 'ही' पद्धत सर्वात बेस्ट म्हणून उपयुक्त, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Technique : शेळी पालनासाठी 'ही' पद्धत सर्वात बेस्ट म्हणून उपयुक्त, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goat Farming Technique bandist sheli palan method is best for goat farming, know in detail | Goat Farming Technique : शेळी पालनासाठी 'ही' पद्धत सर्वात बेस्ट म्हणून उपयुक्त, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Technique : शेळी पालनासाठी 'ही' पद्धत सर्वात बेस्ट म्हणून उपयुक्त, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Technique : संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, वेळेवर औषधोपचार, शेळयांची वैयक्तिक काळजी फक्त बंदिस्त व्यवस्थापन (sheli Palan) पध्दतीमध्येच शक्य आहे.

Goat Farming Technique : संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, वेळेवर औषधोपचार, शेळयांची वैयक्तिक काळजी फक्त बंदिस्त व्यवस्थापन (sheli Palan) पध्दतीमध्येच शक्य आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farming Technique : राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे बंदिस्त शेळीपालन (Bandist shelipalan) ही काळाची गरज ठरत आहे. कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, वेळेवर औषधोपचार, शेळयांची वैयक्तिक काळजी, वनसंरक्षण, पर्यावरणाचा समतोल फक्त बंदिस्त व्यवस्थापन (sheli Palan) पध्दतीमध्येच शक्य आहे. 

बंदिस्त शेळीपालन काय आहे? 

  • या व्यवस्थापन पध्दतीमध्ये शेळ्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवसरात्र सुधारित वाड्यामध्ये ठेवल्या जातात. 
  • या व्यवस्थापन पध्दतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठविल्या जात नाहीत. 
  • गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी आणि औषधोपचार वाड्यातच केला जातो. उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणून ही पध्दत वापरण्यात येते. 
  • या पध्दतीमध्ये शेळ्याचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटामध्ये ठेवण्यात येते. 
  • यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित वाड्याची आवश्यकता असते. 
  • या पध्दतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसीत होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. 
  • यामध्ये शेळयांच्या व्यवस्थापनाकरिता मजूरांची आवश्यकता असते. 
  • चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. 
  • साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधरणपणे २ गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळी-पालनामध्ये निवात्याकरिता एका शेळीला १० चौ. फु. बंदिस्त आणि २० चौ. फु. मोकळी जागा, पैदाशीच्या नराला १५ चौ. फु. बंदिस्त आणि ३० चौ.फु. मोकळी जागा तसेच एका करडाला ५ चौ. फु. बंदिस्त आणि १० चौ. फु. मोकळी जागेची आवश्यकता असते. 
  • याप्रमाणे बाडा बांधकामाचे नियोजन करावे लागते.
  • बंदिस्त शेळी पालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. 

 

या पद्धतीचे फायदे 

  • यामध्ये सांसर्गिक रोगांचे प्रमाण कमी राहते. तसेच लेंडीखताचे जास्त उत्पादन मिळते. 
  • शेळयाना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो. त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. 
  • व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच विविध नोंदी अद्यायावत ठेवणे सोईचे होते. 
  • व्यापारी तत्वावर मांस व दुध उत्पादनासाठी ही फार चांगली पध्दत आहे. परंतु, बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या पूर्ण परावलंबी असतात. 
  • अन्न, निवारा, औषधोपचार व व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना शेळी पालकांवर अवलंबून राहावे लागते. 
  • बंदिस्त व्यवस्थापन पध्दतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंताचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  • मर्यादित स्वरुपात हालचाली होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी मांस उत्पादन वाढीस मदत होते.

 

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक

Web Title: Latest News Goat Farming Technique bandist sheli palan method is best for goat farming, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.