Goat Farming : आपल्या देशात पशुपालन (Goat Farming) मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पशुपालन करणारे शेतकरी नेहमीच डबल नका देणारे पशु पाळण्यास प्राधान्य देतात. दुहेरी नफा देणाऱ्या प्राण्यांमध्ये शेळीपालन व्यवसाय महत्वाचा मानला जातो. शेळ्या पाळून तुम्ही दूध आणि मांस अशा दोन प्रकारे नफा मिळवू शकता.
मात्र एकीकडे काही लोक शेळीपालनासाठी (Goat Farming techniques) विविध सरकारी योजना राबवून चांगले पैसे कमवत आहेत, तर दुसरीकडे काही पशुपालक असे आहेत, ज्यांना शेळीपालनात नुकसान सहन करावे लागते आहे. शेळीपालन करताना जर तुम्ही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
चुकीच्या वेळी शेळीपालन करू नका
शेळीपालन सुरू करण्याची वेळ खूप महत्त्वाची असते. शेळ्या पाळण्यासाठी हिवाळा आणि पावसाळा ऋतू योग्य मानला जात नाही. जर तुम्हाला शेळ्या पाळायच्या असतील तर तुम्ही फेब्रुवारीच्या अखेरीपासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते करू शकता.
कळपात चुका करू नका
शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्या खूप लवकर आजारी पडतात. आजारी शेळ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी, त्यांच्या कळपात स्वच्छता ठेवणे खूप महत्वाचे आहे. जिथं शेळ्या बांधल्या जातात तिथं स्वच्छता नसल्यास शेळ्या आजारी पडण्याची शक्यता असते.
चारताना काळजी घ्या
शेळ्यांचा स्वभाव खेळकर असतो. त्यांना एकाच ठिकाणी बंदिस्त राहण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात राहायला आवडते. जर तुम्ही शेळ्यांना चरायला बाहेर घेऊन जात असाल तर त्या काय खातात, याची खात्री करा. कधीकधी काही झाडांची पाने त्यांच्यावर परिणाम करू शकतात.
या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
मूलभूत चुका टाळल्यानंतर, शेळ्या पाळणाऱ्या लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेळ्यांना दररोज आवश्यक खाद्य द्यावे. शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना कडुलिंब आणि गुळवेलची पाने खायला द्या. शेळ्यांना दिले जाणारे पाणी नेहमीच स्वच्छ आणि ताजे असावे. त्यांना घाणेरडे किंवा शिळे पाणी दिल्याने ते आजारी पडू शकतात.