Goat Farming Tips : शेळी पालन (Sheli Palan) हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी (Goat Care in Winter) हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.
शेळ्यांना (Goat Farming) निरोगी ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामध्ये शेळ्यांचा निवारा, चारा, आहार इत्यादींची निगा राखावी लागते. तसेच तिन्ही ऋतूंमध्ये देखील वेगवगेळ्या पद्धतीने शेळ्यांची काळजी घ्यावी लागते. सद्यस्थितीत काहीशी थंडी, दुपारी ऊन असा वातावरण बदल अनुभवण्यास मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत थोडक्यात माहिती घेऊयात....
असे करा शेळ्यांचे व्यवस्थापन
- सर्वात पहिल्यांदा शेळ्यांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
- शेळ्यांना स्वच्छ आणि गर्दी नसलेला निवारा द्यावा.
- गाभण शेळ्यांना चार-सहा आठवडे अगोदर खुराक वाढवावा.
- विण्याअगोदर दोन-तीन आठवडे गाभण शेळ्यांचे जंत निर्मूलन करावे.
- एक वर्ष वयाच्या नर करडांचे पशुवैद्यकाकडून खच्चीकरण करावे.
- शेळी विण्याच्या नोंदी, करडांची स्वच्छता, नाळ कापणे, जन्मतःचे वजन करणे, नवजात पिल्लांना चीक पाजवणे या बाबींचे काटेकोर पालन करावे.
- विलेल्या शेळ्यांना दुधासाठी खनिज मिश्रण व खुराकाची मात्रा वाढवावी.
- पाणी आणि चारा व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे, शेळ्यांना योग्य पोषण द्यावे.
- उबदार हवामानात अतिउष्णता आणि थंडीपासून संरक्षण द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी