Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goat Farming Tips : शेळ्यांची वाहतूक करतांना घ्यावयाची काळजी, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Tips : शेळ्यांची वाहतूक करतांना घ्यावयाची काळजी, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goat farming Tips Precautions to be taken while transporting goats, know in detail | Goat Farming Tips : शेळ्यांची वाहतूक करतांना घ्यावयाची काळजी, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Tips : शेळ्यांची वाहतूक करतांना घ्यावयाची काळजी, जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming Tips : शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन (Goat Sales Management) करताना वाहतुकीचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक ठरते.

Goat Farming Tips : शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन (Goat Sales Management) करताना वाहतुकीचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक ठरते.

शेअर :

Join us
Join usNext

Goat Farming Tips : शेळ्यांचे विक्री व्यवस्थापन (Goat Sales Management) करताना वाहतुकीचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक ठरते. विक्रीसाठी बाजारात नेताना वाहतूक कशी करावी? वाहतुकीचे साधन? आणि इतर पर्यायी व्यवस्था कशी उभी करावी, याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊयात.... 

शेळ्या-मेंढ्यांच्या वाहतुकीमध्ये घ्यावयाची काळजी :-

  • प्रवासापुर्वी शेळ्यांना चारा-पाणी व विश्रांती दयावी.
  • लहान करडे, गाभण, व्यालेल्या अशक्त आजारी शेळ्यांची व्यवस्था ट्रकच्या पुढच्या भागात किंवा दुसऱ्या मजल्यावर करावी, म्हणजे ती पायदळी तुडवली जाणार नाही.
  • प्रवास थंडीच्या वेळी करावा.
  • संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या प्रदेशातुन प्रवास करू नये.
  • प्रवासात सोबत प्रथमोपचाराचे सर्व साहित्य, औषधे, दोर, बॅटरी, बादली, धारदार हत्यार जवळ ठेवावे.
  • विश्रांतीच्या वेळी किंवा चरावयास शेळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरून घ्याव्यात.
  • प्रवासापूर्वी शेळयांच्या वाहतुकीकरिता विमा उतरून घ्या. (Transit Insurance)
  • वाहन चालकाकडे वाहतुक परवाना आहे का, ट्रकचा विमा उतरविला आहे का, याची खात्री करून घ्यावी.
  • डोंगराच्या प्रदेशातुन वेडी वाकडी वळणे असलेल्या रस्त्यावर प्रवास करतांना वाहनामध्ये जनावरे कमी ठेवण्यात यावे.
  • वाहतुकीबाबत शासनाच्या नियमांचे पालन करा.
  • प्रवासात ट्रकचा वेग सावकाश असावा. वारंवार ब्रेक मारू नका म्हणजे शेळ्या मेंढ्या एकमेंकावर आदळणार नाहीत.

 

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

Web Title: Latest News Goat farming Tips Precautions to be taken while transporting goats, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.