Sheli Vima :शेळ्यांचा विमा (Goat Insurance) म्हणजे, शेळ्यांच्या मृत्यूसाठी नुकसानभरपाई देणारी पॉलिसी (Sheli Vima). या पॉलिसीमध्ये आग, वीज, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन, संप, दंगल, आजार, आणि अपघातामुळे झालेल्या मृत्यूसाठी नुकसानभरपाई दिली जाते. शेळ्यांच्या विमा काढताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, हे सविस्तर जाणून घेऊयात....
शेळ्यांचा विमा खालील विमा कंपन्यांच्या विविध शाखांमार्फत उतरविला जातो.
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
- न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी
- ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी
शेळयांचा विमा उतरविण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या आहेत.
वयोमर्यादा : ६ महिने ते ७ वर्षे
विमा हमी रक्क्म : बाजारभावाप्रमाणे शेळींची असलेली किंमत ही विमा हमी रक्क्म मानली जाते.
विमा दर : शेळीच्या किंमतीवर ४% तसेच यानुसार येणाऱ्या प्रीमियम रकमेवर १८% जीएसटी.
नुकसान भरपाई : शेळ्या अपघाताने अथवा रोगांमुळे मृत्यु झाल्यास विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते, विशिष्ट रोगांकरिता लस वापरण्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अन्यथा नुकसान भरपाई मिळत नाही.
विमा कसा उतरावा :
- कंपनीचा विहीत नमुन्यातील फॉर्म आणि प्रमाणपत्र संपूर्ण भरून दयावे.
- नोंदणीकत पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र जोडावे.
- कानामध्ये ओळख चिन्ह म्हणुन बिल्ला लावावा.
विमा दावा पद्धती :
- शेळ्यांच्या मृत्युची लेखी सुचना विमा कंपनीस त्वरीत दयावी.
- विमा दावा प्रमाणपत्र भरून दयावे.
- मृत्युचा दाखला आणि शवविच्छेदन प्रमाणपत्र दयावेत.
- ओळखचिन्ह म्हणुन वापरलेला कानांतील बिल्ला (टॅग) विमा कंपनीच्या प्रपत्रासोबत दयावा.
महत्वाच्या सुचना :
विमा कंपन्या कानातील ओळखचिन्ह टेंग हरविल्यास मृत जनावराचा विमा दावा मंजूर करीत नाही. त्यामुळे जनावराचा कानातील विल्ला हरविल्यास विभा कंपनीला तात्काळ लेखी कळवून नविन बिल्ला लावून त्याची विमा प्रमाणपत्रात नोंद झाल्याची खात्री करून घ्यावी. शेळी पालकाने शेळ्यांना विविध प्रकारचे रोग प्रतिबंधक लसीकरण आणि इतर औषधोपचार कल्याच्या नोंदी ठेवाव्यात.
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक