Join us

Goat Farming Tips : शेळ्या विक्रीसाठी घेऊन जाताना अशी घ्या काळजी, होईल फायदाच फायदा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:08 IST

Goat Farming Tips : त्या कालावधीत बऱ्याच गावजत्रा, लग्नसराई असतात, त्यामुळे नर मोठ्या प्रमाणावर खपू शकतात.

Goat Farming Tips : शेळी-मेंढी पालनातुन (Sheli Palan) प्रतिवर्षी किती संख्येने बोकड, शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध होतात आणि त्यांना बाजारपेठेत किती भाव मिळतो, यावर व्यवसायाच्या नफ्याचे प्रमाण मुख्यत्वेकरून अवलंबुन असते. बाजारपेठेत भाद्रपद-श्रावण महिने वगळता, बकरी ईद, होळी, आषाढी अमावस्या इ. सणांच्या वेळेस म्हणजे मार्च-एप्रिलच्या सुमारास नरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

त्या कालावधीत बऱ्याच गावजत्रा, लग्नसराई असतात, त्यामुळे नर मोठ्या प्रमाणावर खपू शकतात. या काळात भावदेखील (Sheli Bajar) उत्तम असतो. तेंव्हा या वेळी आपल्या कळपातील नर बोकड मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी माजाचे नियोजन करून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या वितील (Goat Market) आणि सशक्त करडांचे उत्पादन होईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

विक्रीसाठी शेळ्या घेऊन जाताना घ्यावयाची काळजी

  • विक्रीकरिता शेळ्या घेऊन जातांना त्या अशक्त दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • शेळ्या बाजारात चालवत घेऊन जाणार असाल तर सावकाश घेऊन जावे.
  • शेळ्यांच्या अंगावर जखमा, गोचिड, उवा यांचा प्रादुर्भाव झालेला नाही याची खात्री करावी.
  • बाजारात आणल्यावर त्यांना चारा-पाणी करावे म्हणजे त्या थकलेल्या दिसणार नाहीत.
  • बाजारांत दुसत्यांच्या रोगी शेळ्या आपल्या शेळ्यांचा जवळ येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • बाजारामध्ये मालक या नात्याने सतत हसतमुख रहावे, गिऱ्हाईकावर चिडू नका.
  • शेळ्यांची खरेदी विक्री वजनावर करण्याचा आग्रह धरावा.
  • जास्त किंमत मिळण्यासाठी क्षणीक लोभाला बळी पडून गैर मार्गाचा अवलंब करू नये.
  • शेळ्या वाहतुकीसाठी ट्रक/टेम्पो/रेल्वे वॅगल मधील जागा त्याच्या वजनाच्या प्रमाणात लागते. 
  • उदा. २५ किला वजनापर्यंत २ चौ. फुट, २६ ते ३५ किलो वजनावर २.५ चौ. फुट आणि ३५ किलोपेक्षा अधिक वजन किंवा गाभण शेळ्यांना प्रत्येकी ३.०० चौ. फुट तळ जमीन पुरेशी होते.

- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक 

टॅग्स :शेळीपालनशेतीदुग्धव्यवसायमार्केट यार्डदूध