Goat Farming Tips : बाजारात किंवा पशुपालकाकडून पशुधन (Livestock Buying) खरेदी करण्यासाठी जात असतो. अशावेळी जनावरांचे वय देखील महत्वाचे असते. जर समजा शेळी खरेदी (Sheli Kharedi) करण्याचे ठरले तर शेळीचे वय कसे ओळखायचे? तर शेळीच्या दातांवरून आपल्याला वय ओळखता येते, ते कसे? जाणून घेऊयात...
दातावरुन शेळ्यांचे वय ओळखणे -
- शेळीच्या वरच्या बाजूस चावण्याचे / तोडण्याचे दात नसतात.
- दाताच्या ऐवजी त्याजागी एक कठीण पेंड असते.
- करडांच्या सुरुवातील असणाऱ्या दातास दुधाचे दात (Milk Teeth) असे म्हणतात.
- दुध दात कालमानानुसार पडतात व त्याच्या जागी कायमचे दात येतात.
- या विशिष्ट दातावरुन शेळी व बोकड यांच्या वयाचा अंदाज येतो.
- करडास जन्मल्यानंतर पहिल्या अठवड्यात समोरच्या दुध दाताच्या मधल्या ३ जोड्या येतात.
- बाहेरची ४थी जोडी वयाच्या ४ थ्या आठवड्यात उगवते.
- कालांतराने करडू जसे-जसे मोठे होते तस-तसे हे दुध दात पडतात व त्याजागी कायमचे दात उगवतात.
त्याचा कालावधी खालिलप्रमाणे-
१) पहिली जोड़ी १५ ते १८ महिने
२) दुसरी जोडी - २० ते २५ महिने
३) तिसरी जोडी - २४ ते ३१ महिने
४) चौथी जोडी २८ ते ३५ महिने
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक