Goat Market : महाराष्ट्रात शेळ्यांचे बाजार (Maharashtra Goat Market) विविध ठिकाणी पाहायला मिळतात. त्या त्या जिल्ह्यातील आठवडी बाजार असलेल्या गावात शेळ्यांचा बाजार भरत असतो. शिवाय या ठिकाणी परिसरातील पशुपालकांना (Goat Farmer) जवळची बाजारपेठही उपलब्ध होते. आता महाराष्ट्रात नेमक्या कुठे-कुठे बाजारपेठ आहेत? ते सविस्तर पाहुयात....
महाराष्ट्रातील काही निवडक जिल्ह्यात शेळ्यांचे प्रमुख बाजार आहेत. आपण जिल्हा गाव आणि बाजाराचा वार यानुसार माहिती घेऊयात... मुंबईत देवनार या गावात सोमवार आणि शुक्रवार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि कणकवली या गावात बुधवार आणि मंगळवार रोजी, ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि सरळगाव या ठिकाणी गुरुवार आणि मंगळवार रोजी बाजार भरतो.
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा या गावात मंगळवार रोजी, नाशिक जिल्ह्यात मालेगाव या ठिकाणी शुक्रवार रोजी, धुळे जिल्ह्यात दोंडाईचा या ठिकाणी गुरुवार रोजी, अहिल्यानगर जिल्ह्यात राशीन या ठिकाणी मंगळवार रोजी, पुणे जिल्ह्यात चाकण आणि यवत या ठिकाणी शनिवार आणि शुक्रवार रोजी, सातारा जिल्ह्यात लोणंद या ठिकाणी गुरुवार रोजी, सोलापूर जिल्ह्यात सांगोला या ठिकाणी रविवार रोजी भरत असतो.
बीड जिल्ह्यात नेकनूर आणि रेनापुर या गावात अनुक्रमे रविवार व शुक्रवार रोजी, लातूर जिल्ह्यात मुरुड, उदगीर आणि हाळी या ठिकाणी मंगळवार, गुरुवार आणि रविवार रोजी, उस्मानाबाद या ठिकाणी येडशी या गावात रविवार रोजी तर अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार या ठिकाणी रविवार रोजी शेळ्यांचा बाजार भरत असतो.