Goat Market : शेळीपालन व्यवसाय (Goat Farming) सुरू करण्यासाठी अनेकदा बाजारातून योग्य प्रतीच्या शेळ्या विकत घेणे आवश्यक असते. त्यानुसार पुढील उत्पादनावर परिणाम होत असतो. सद्यस्थितीत आवक घटली असून बोकडापेक्षा शेळीला (Sheli Bajarbhav) चांगला भाव मिळत आहे. आजच्या घडीला शेळीला, बोकडाला बाजारात काय भाव मिळतोय? ते पाहुयात...
शेळीला पलूस बाजारात कमीत कमी 3600 रुपयापासून ते सरासरी 7 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर याच बाजारात मागील आठवड्यात सरासरी 7400 रुपयांचा दर मिळाला होता. यात 400 रुपयांची घसरण झाली आहे.
तर सांगली बाजारात बोकडाला कमीत कमी 2000 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. बुलढाणा बाजारात सरासरी 4 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र सांगली बाजारात भाव टिकून असल्याचे चित्र आहे.
भिवंडी बाजारात बकऱ्याची चांगली आवक होत असून आज 2565 नग दाखल झाले होते. यावेळी कमीत कमी 3500 रुपये तर सरासरी 4500 रुपयांचा दर मिळाला. तर १६ नोव्हेंबर रोजी याच बाजारात 3155 नग विक्रीसाठी आले होते. या दिवशी देखील हाच बाजारभाव मिळाला. त्यानुसार सद्यस्थितीत शेळीला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : Sheli Palan : शेळीपालन व्यवसायात शेळ्यांची व बोकडाची निवड कशी करावी जाणून घ्या सविस्तर