Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Goshala Anudan : गोशाळेतील गाय अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर 

Goshala Anudan : गोशाळेतील गाय अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Goshala Anudan Apply for Goshala grant by December 31, know the details | Goshala Anudan : गोशाळेतील गाय अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर 

Goshala Anudan : गोशाळेतील गाय अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर 

Goshala Anudan : सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना ५० प्रतिदिन प्रती गोवंश अनुदान (Goshala Anudan) देण्यात येणार आहे.

Goshala Anudan : सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना ५० प्रतिदिन प्रती गोवंश अनुदान (Goshala Anudan) देण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Goshala Anudan : गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना ५० प्रतिदिन प्रती गोवंश अनुदान (Goshala Anudan) देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. 

सदर योजनेंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार गोसंगोपनाचा किमान ३ वर्षे अनुभव असलेल्या, गोशाळेत (Goshala) किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत आहे. 

प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी १ ते १० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समितीद्वारा प्राथमिक तपासणीत पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी ११ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. इच्छुक गोशाळा संचालकांनी ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.

काय आहे ही योजना 
गोशाळाांना आर्थिकदृष्ट्टया सक्षम करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सन 2024-25 पासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या गायींना रु.५०/- प्रति दिन प्रति गोवंश अनुदान देण्याची योजना आहे. 

१) महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळातील भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेल्या देशी गायींच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान अनुज्ञेय राहील.
२) अनुदानाची रक्कम रुपये ५०/- प्रति दिन प्रति देशी गाय.
१) महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था अनुदानासाठी पात्र राहतील.
२) संस्थेस गोसंगोपनाचा कमीतकमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
३) गोशाळेत किमान ५० गोवंश असणे आवश्यक राहील.
४) संस्थेतील गोवंशीय पशुधनास ईअर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) करणे अनिवार्य राहील.
५) ईअर टॅगिंग असलेले गोवंशीय पशुधन अनुदानास पात्र राहील.
६) संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

 

Solar Pump Vendor : सोलर पंप कंपनी निवडतांना 'या' गोष्टी विसरू नका? जाणून घ्या सविस्तर 

Web Title: Latest News Goshala Anudan Apply for Goshala grant by December 31, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.