Goat, Sheep Management : सध्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून दुपारपर्यंत कडक उन्ह तर ३ वाजेनंतर विजांच्या कटकडाटासह पावसाचे आगमन (Rain) होत आहे. ऑक्टोबर हिटचा सामना (October Hit) पिकांसह पशूंना देखील होत आहे. त्यामुळे या दरम्यान शेळ्या मेंढ्याची काळजी घेणे आवश्यक असते. या काळात चाहूल लागण्याची चिन्हे असतात. अशा स्थितीत कसे व्यवस्थापन करावे, हे समजून घेऊया....
ऑक्टोबरमधील शेळ्यांतील व्यवस्थापन
माज ओळखणारा बोकड गोठ्यापासून वेगळा व दूर ठेवावा.
पैदाशीच्या योग्य नोंदी ठेवाव्यात.
पैदाशीच्या माद्यांमध्ये परजीवींचे प्रमाण तपासावे व आवश्यकतेनुसार जंत निर्मूलन करावे.
शेळ्यांचे वाढलेले खूर कापून घ्यावेत.
ऑक्टोबरमधील मेंढ्यांतील व्यवस्थापन
लेंडी नमुने तपासून जंताचे औषध द्यावे.
पैदासीकरिता निरुपयोगी असलेल्या नरांचे खच्चीकरण करावे.
मेंढ्यांचे वाड्यामधील मातीचा थर बदलावा.
बाह्यकीटक प्रतिबंधाकरिता गोचिडनाशक द्रावणाने मेंढ्या धुऊन घ्याव्यात.
मेंढ्यांची लोकर कातरणी करण्यात यावी.
निरोपयोगी मेंढ्या कळपातून काढून त्यांची विक्री करण्यात यावी.
बदलत्या वातावरणापासून मुख्य सकाळी व संध्याकाळी कळपातील मेंढ्याचे संरक्षण करावे.
- ग्रामीण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.