Winter Goat Sheep Care : शेतकरी बांधवानो, तुम्ही जर शेळी मेंढीचे पालन Goat Farming) करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. कारण हिवाळा (Winter Season) सुरु झाला आहे, शिवाय थंडी वाढू लागली आहे. या दिवसांत पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागते. शेळ्या मेंढ्यांचा आहार कसा असावा? काळजी कशी घ्यावी? याबाबतची प्राथमिक माहिती घेऊया....
शेळ्यांतील व्यवस्थापन
- पैदाशीचे बोकड शेळ्यांपासून वेगळे ठेवावेत.
- विणाऱ्या शेळ्यांसाठी गोठ्यात स्वतंत्र व्यवस्था करावी.
- गाभण जनावरांचा आहार व आरोग्यावर लक्ष ठेवावे.
- पशुवैद्यकांकडून लसीकरण करून घ्यावे.
- थंडीपासून बचावासाठी निवाऱ्याची जागा संरक्षित करावी.
- रोगांपासून संरक्षणासाठी निवाऱ्याची नेहमी स्वच्छ ठेवावी.
- वजनवाढीसाठी सुयोग्य काळ असल्याने चांगल्या प्रतीचा चारा द्यावा.
मेंढ्यांतील व्यवस्थापन
- थंड हवेपासून कळपाचे संरक्षण करावे.
- नवजात कोकरांना व मेंढ्यांचे थंडीपासून संरक्षण करावे.
- कोकरांचे शारीरिक वजन घेऊन नोंदी ठेवाव्यात.
- गाभण मेंढ्या व मेंढरांना ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.
- आहार हा ऊर्जादायी असावा, जेणेकरून थंडीत शरीराचे तापमान नियमित राहील.
- मेंढ्या बांधण्याची जागा जंतुनाशकाने स्वच्छ करावी.
- उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतंज्ञांच्या सल्ल्याने गोचीडनाशकाचा वापर करावा.
- ग्रामीण मौसम कृषी सेवा, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी