Mendhi Vyavasthapan : मेंढी व्यवस्थापन (Sheep Management) करण्यासाठी आनुवंशिकता, पोषण, पुनरुत्पादन, आरोग्य व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यासह इतर बारीक सारीक गोष्टीमध्ये मेंढ्याचा निवारा असेल पाणी व्यवस्थापन असेल या गोष्टी देखील पाहाव्या लागतात. दुसरीकडे फेब्रुवारी महिन्याचा विचार तर काहीशी थंडी उन्हाची चाहूल या काळात होत असते. या काळात मेंढ्याचे व्यवस्थापन (Mendhi Vyavsthapan) कसे करायचे? हे पाहुयात....
फेब्रुवारीमधील मेंढ्यांतील व्यवस्थापन
- नवजात कोकरांमध्ये जुलाब व ताप अशी लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार तातडीने उपचार करावे.
- पैदाशीच्या मेंढ्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे.
- माजावर आलेल्या मेंढ्यांना नराद्वारे रेतन करावे.
- पैदाशीकरिता वापरण्यात येणाऱ्या मेंढेनरांच्या खाद्यावर विशेष लक्ष द्यावे.
- कोकरांना प्रती कोकरू १०० ग्रॅम चारा द्यावा.
- सकाळच्या वेळी कोकरांना हिरवा झाडपाला खाद्यामध्ये द्यावा.
- मेंढ्यांना लाळ्या खुरकुत रोग नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
- लोकर कातरणीच्या आधी मेंढ्यांना धुवावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी