Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर 

Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर 

Latest News milk Business Make these three changes to profit in dairy business read in detail  | Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर 

Dairy Business :'या' तीन गोष्टी करा, दूध व्यवसाय फायद्यात राहील, वाचा सविस्तर 

Dairy Business : जर तुम्ही आधीच दुग्धव्यवसाय करत असाल तर लगेचच दुग्धव्यवसायात हे तीन बदल करा.

Dairy Business : जर तुम्ही आधीच दुग्धव्यवसाय करत असाल तर लगेचच दुग्धव्यवसायात हे तीन बदल करा.

शेअर :

Join us
Join usNext

Dairy Business : गेल्या काही वर्षांत आपल्या देशात अनेक लोक दुग्धव्यवसाय (Milk Business) करत आहेत. आर्थिक उत्पन्न बळकट करण्यासाठी दुग्ध व्यवसाय देखील चांगला मानला जातो. दुग्धव्यवसाय करून चांगले पैसे कमवायचे असतील तर काय करावे यासोबतच काय करू नये हे देखील जाणून घेतले पाहिजे.

गेल्या अनेक वर्षांपासून डेअरी उघडूनही (dairy Business) तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही आधीच दुग्धव्यवसाय करत असाल तर लगेचच दुग्धव्यवसायात हे तीन बदल करा.

जाती ओळखा
डेअरी उघडताना कोणताही प्राणी पाळू नये. गाय किंवा म्हशीचे संगोपन करण्यापूर्वी गाई आणि म्हशीच्या चांगल्या दुभत्या जातीची माहिती घ्यावी. दुग्धव्यवसायात फक्त चांगले आणि दुधाळ जनावरेच पाळावीत. म्हशींसाठी मुर्राह, जाफराबादी, मेहसाणा आणि सुरती जाती पाळण्याचा सल्ला दिला जातो, तर गायींसाठी, गिर आणि साहिवाल जाती पाळण्याचा सल्ला दिला जातो. 

जनावरांचा आहार बदला
पशुपालकांना वाटत की जनावरांना जितके जास्त खायला द्याल तितके ते अधिक दूध देतील. पण हे अपवादात्मक आहे. जनावरांना समतोल आहार आणि योग्य वेळी आहार दिला, तर फायदा होतो. जनावरांना हिरवा चारा, सुका चारा किंवा शेंगदाणा ढेप द्या. तसेच प्रति जनावरे 2-4 किलो आहार देणे आवश्यक आहे. खाद्य देण्याची वेळ दररोज ठरलेली असावी. दिवसभरात तीन वेळा खाद्य द्या. पिण्यासाठी भरपूर स्वच्छ आणि ताजे पाणी द्या.

संसर्ग आणि रोगापासून संरक्षण करा
पशुपालकांसाठी महत्वाचे म्हणजे नेहमी जनावरांच्या आरोग्याची चौकशी करा. वेळोवेळी पशुवैद्यांकडून तपासणी करून घ्या आणि आवश्यक लसीकरण करून घ्या. जर एखादे जनावरं आजारी असेल तर त्याला स्वतंत्रपणे बांधण्याची व्यवस्था करा. या सर्वांशिवाय जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. 

या गोष्टीही लक्षात ठेवा
जनावर खरेदी करताना चांगल्या जातीची निवड करा. आहाराबद्दल जाणून घ्या आणि प्रतिकारशक्ती वाढवा. या सर्वांसोबतच प्राण्यांची देखभालही खूप महत्त्वाची आहे. प्राण्यांना बंदिस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंपणाची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे घाण पाणी किंवा शेण साचू नये. तसेच हिवाळ्याच्या दिवसात जनावरांना थंड वाऱ्यापासून वाचवण्यासाठी शेडची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News milk Business Make these three changes to profit in dairy business read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.