Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Milk Center : 103 गावांसाठी एकच दूध संकलन केंद्र, शेतकऱ्यांना दरही मिळेना, वाचा सविस्तर 

Milk Center : 103 गावांसाठी एकच दूध संकलन केंद्र, शेतकऱ्यांना दरही मिळेना, वाचा सविस्तर 

Latest News One milk collection center for 103 villages in gadchiroli district read in detail  | Milk Center : 103 गावांसाठी एकच दूध संकलन केंद्र, शेतकऱ्यांना दरही मिळेना, वाचा सविस्तर 

Milk Center : 103 गावांसाठी एकच दूध संकलन केंद्र, शेतकऱ्यांना दरही मिळेना, वाचा सविस्तर 

Milk Center : याआधी आरमोरी तालुक्यातील वैरागड, ठाणेगाव या दोन गावात दूध संकलन केंद्र होते. मात्र आता दूध विक्रीची सुविधा नसल्याने अडचण होत आहे.

Milk Center : याआधी आरमोरी तालुक्यातील वैरागड, ठाणेगाव या दोन गावात दूध संकलन केंद्र होते. मात्र आता दूध विक्रीची सुविधा नसल्याने अडचण होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : भरपूर जंगल, चराई क्षेत्र, चाऱ्याची कमतरता नाही अशा स्थितीत १०३ लहान मोठ्या गावांचा समावेश असलेल्या आरमोरी तालुक्यात केवळ ठाणेगाव येथे एकच दूध संकलन केंद्र आहे. तालुक्यात जनावरांची संख्या जास्त असली तरी पशुपालक दुधाळ जनावरे बाळगत नाहीत. कारण दुधाला योग्य भाव मिळेल असे दूध संकलन केंद्र (Milk Center) ठाणेगाव नंतर दुसरे कुठेही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध विक्रीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) वैरागड येथे जय किसान दुग्ध सहकारी संस्था या नावाने नोंदणीकृत सहकारी दूध डेअरी होती. ही संस्था चांगली आर्थिक भरभराटीला आली होती. या संस्थेची स्वमालकीची जागा देखील आहे. या संकलन केंद्रावर परिसरातील सुकाळा, मोहझरी, वडेगाव, डॉगरतमाशी, मेंढेबोडी, नागरवाही येथील पशुपालक दूध विक्रीसाठी आणत पण कालांतराने वैरागड येथील दुग्ध सहकारी संस्था अवसायानात निघाली. तेव्हापासून वैरागड येथे दूध संकलन केंद्र सुरू झाले नाही किंवा संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांनी येथे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्याकडे शेतजमीनी आहेत, त्यामुळे शेतीसोबतच काही शेतीपूरक व्यवसाय म्ह्णून दूध व्यवसाय केला जातो. यासाठी काही जमिनीत चाऱ्याचे उत्पादन घेता येते. तसेच धानाच्या बांधीच्या पाळीवर उगवलेले गवत जनावरांसाठी उपलब्ध होते. गावाच्या सभोवताल जंगल व मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत जनावरे चरतात. वातावरणसुद्धा जनावरांसाठी अनुकूल आहे. याआधी आरमोरी तालुक्यातील वैरागड, ठाणेगाव या दोन गावात दूध संकलन केंद्र होते. मात्र आता दूध विक्रीची सुविधा नसल्याने अडचण होत आहे.

दुधाला कमी दर मिळतोय... 

शेतकरी राहुल धाईत म्हणाले की, दुधाळ जनावरांना जी खुराक द्यावी लागते तेवढा पैसा दुग्ध उत्पादकांना मिळत नाही. घरोघरी जाऊन कमी दरात दूध- दही विकावे लागते. परवडत नसल्याने शेतकरी दुधाळ जनावरे पाळत नाहीत. तर संपत आडे म्हणाले की, जंगलाचे मोठे क्षेत्र आणि चरण्यासाठी मोकळी जागा असताना जिल्ह्यात दूध उत्पादकांना चालना मिळेल असे फारसे प्रयत्न लोकप्रतिनिधींनी केले नाहीत. सुकाळा किंवा वैरागड येथे केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. 

Web Title: Latest News One milk collection center for 103 villages in gadchiroli district read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.