Join us

Maharashtra Budget 2024 : गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान, एक जुलैपासून अंमलबजावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 3:00 PM

Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना पशु पालकांसाठी घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2024 : एकीकडे दुधाला मिळणाऱ्या दरामुळे दूध उत्पादक (Milk Farmers) शेतकरी नाराज आहेत. अशातच आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर करताना पशु पालकांसाठी दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या ०१ जुलै पासून गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या (rainy Session) तिसऱ्या दिवशी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी दूध दरावरून राज्यात आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हाच मुद्दा हेरून अजित पावरा यांनी अर्थसंकल्पात पशु पालकांना दिलासा दिला आहे. यावेळी अर्थ संकल्प सादर करताना अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले की, शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक उन्नती साधने, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. 

दरम्यान राज्यातील नोंदणीकृत 02 लाख 93 हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. शिवाय गायीचे दूध उत्पादन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देणार असल्याची घोषणा पावर यांनी यावेळी केली. तसेच हे अनुदान पुढेही चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत असल्याचे ते म्हणाले. 

शेळी मेंढी पालन तसेच मत्स्यशेती 

शेळी-मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवला लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. तसेच राज्यात मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात असेही ते म्हणाले.  

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024महाराष्ट्रअर्थसंकल्प 2024शेतीदूधशेती क्षेत्र