Join us

Sheep Disease : मेंढ्यांच्या पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा, असे करा उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 5:11 PM

Sheep Disease : सततच्या पावसाने झालेल्या चिखलामुळे मेंढ्यांच्या पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा होऊन आजारी होम्याचे प्रमाण वाढले आहे.

Sheep Disease Management : सततच्या पावसाने झालेल्या चिखलामुळे मेंढ्यांच्या (Sheep) पायांच्या खुरात चिखल्या व तोंडात जखमा होऊन आजारी होम्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय या आजारातून बाहेर न पडलेल्या मेंढ्या दगावत असल्याचे समोर आले आहे. मेंढपाळ व्यावसायिकांच्या वनचराईसाठी बसलेल्या मेंढ्यांच्या बाबतीत असा प्रकार समोर आल्याने हे मेंढपाळ चिंतेत आहेत. नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, पाहुयात.... 

 मेंढ्या चरत असलेल्या परिसरात सतत पाऊस असल्यास जमीन ओलसर होऊन चिखलमय होते. अशावेळी मेंढ्या चिखल्या आजाराला बळी पडतात. खुरांना  चिखल्या होण्याचे कारण म्हणजे मेंढ्याचे पाय सतत पाण्यामुळे ओलसर राहणे, पाण्यामुळे त्वचा नरम होते. त्यामुळे खुरांच्या सांध्यामधे योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण कठीण होते. खुरांच्या सांध्यामधे छोटे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अनेक पटीने असते. 

या उपाययोजना करा 

  • जनावरांचा गोठा कोरडा ठेवण्यासाठी चुन्याचा वापर करावा.
  • या महिन्यामध्ये मेंढ्या विण्याचे प्रमाण जास्त असते. गाभण मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी. 
  • व्यायलेल्या मेंढ्या व नवजात कोकरांची योग्य निगा राखावी.
  • मेंढ्या व्यायल्यानंतर वाडा गरम पाण्याने स्वच्छ करून घ्यावा.
  • जन्मानंतर १ तासाच्या आत कोकरांना चिक पाजावा.
  • दूध देणाऱ्या मेंढ्यांना प्रती मेंढी ४०० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालावे.
  • माजावर आलेल्या मेंढ्या ओळखून कळपामध्ये मेंढा नर सोडावा.
  • खुरांचे आजार टाळण्यासाठी वाढलेले खुर कापून टाकावीत. 
  • पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण करून घेणे. 

संकलन : ग्रामीण मौसम कृषी सेवा केंद्र, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती