Sheli Palan Tips : शेळ्या-मेंढ्यांचे व्यवस्थापन (Sheli Palan) करण्यासाठी, त्यांच्या आहार, आरोग्य, निवास, प्रजनन यांची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सद्यस्थितीत पावसाची शक्यता असल्याने पावसापासून शेळ्यांसाठी साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
पाऊस व विजांपासून शेळी मेंढ्यांचे (Sheli Mendhi Palan) संरक्षण करावे व त्यांना चारण्यास किंवा इतर कारणास्तव बाहेर नेण्यास टाळावे. याशिवाय एप्रिल महिन्यात कोणती काळजी घ्यावी, हे समजून घेऊया...
शेळ्यांतील व्यवस्थापन
- चार आठवड्यांच्या पिलांचे आंत्रविषार व टिटॅनसचे लसीकरण करावे.
- चार ते सहा आठवड्यांच्या पिलांना कानाला बिल्ले मारावेत.
- विलेल्या शेळीला विल्यानंतर चार आठवडे खुराक सुरू ठेवावा.
- करडे शेळीच्या मागे फिरायला लागल्यावर (चरणे सुरू केल्यावर) त्यांचे जंत निर्मूलन करावे.
मेंढ्यांतील व्यवस्थापन
- मेंढ्यांना आंत्रविषार रोग नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
- लोकर कातरणीनंतर दोन आठवड्यांनी मेंढ्यांना गोचिड नाशकाच्या द्रावणाने धुवावे.
- तरुण नरांना अनुभवी वयस्कर मेंढ्यांमध्ये आणि मोठ्या मेंढ्यांना तरुण मेंढ्यांमध्ये ठेवता येते.
- ग्रामीण मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी