Goat Farming : आज, शेळी गरिबांची गाय म्हणून अनेक कुटुंबांची पसंती बनली आहे. गेल्या काही वर्षात शेळीपालन (Shelipalan) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शेळ्या पाळणाऱ्यांची (Goat Farming) संख्या सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते.
या अभियानाच्या आकडेवारीनुसार मागील काही वर्षात शेळीपालनासाठी जास्तीत जास्त कर्जे मागितली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषतः देशातील पाच राज्ये अशी आहेत जिथे शेळीपालनासाठी विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या संस्थेत शेळीपालन प्रशिक्षणासाठी अर्जदारांना दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कुठे वाढतंय शेळीपालन राष्ट्रीय पशुधन अभियानासाठी प्रत्येक राज्यातून अर्ज येतात. पशुपालन आणि संबंधित कामांसाठी अर्ज येतात. प्रत्येक राज्यातून येणाऱ्या एकूण अर्जाची संख्या पाहिली तर बहुतेक अर्ज हे शेळीपालनाशी संबंधित आहेत. जाणून घेऊया देशातील काही निवडक राज्यातील आकडेवारी, यामध्ये पशुधन योजनांसाठी आलेले अर्ज आणि शेळीपालनासाठी आलेले अर्ज...
कर्नाटकएकूण अर्जांची संख्या - १०४०शेळीपालनासाठी - ९५६
मध्य प्रदेशएकूण अर्जांची संख्या- ४१५शेळीपालनासाठी - ३४१
तेलंगणाएकूण अर्जांची संख्या- ४५७शेळीपालनासाठी - ४०९
महाराष्ट्रएकूण अर्जांची संख्या- ३१५शेळीपालनासाठी - २४०
आंध्र प्रदेशएकूण अर्जांची संख्या- २४३शेळीपालनासाठी - २१५
राजस्थानएकूण अर्जांची संख्या- १२५शेळीपालनासाठी- ११९.
तामिळनाडूएकूण अर्जांची संख्या- १४२शेळीपालनासाठी - १३१
उत्तर प्रदेशएकूण अर्जांची संख्या- १४५शेळीपालनासाठी- ११६
आसामएकूण अर्जांची संख्या- ३८शेळीपालनासाठी- २१
छत्तीसगडएकूण अर्जांची संख्या- २०शेळीपालनासाठी- १८
गुजरातएकूण अर्जांची संख्या- ०३शेळीपालनासाठी- ०२