Join us

पशुधनामधील उष्माघाताची लक्षणे कोणती? उपचार काय करावेत? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 7:56 PM

राज्यभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांसोबत पशुधनावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे.

राज्यभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांसोबत पशुधनावर देखील परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पशुधनाची वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या तापमानातउष्माघात होण्याची शक्यता असून याची नेमकी काय लक्षणे आहेत आणि उपचार काय करावा? हे समजून घेणं महत्वाचं आहे. 

उष्माघाताची लक्षणे

जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान-भूक मंद होते.जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६० फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.जनावराचा श्वासाच्छसाचा दर वाढून धाप लागल्या सारख होते.जनावरांच डोळ, लालसर होवून डोळयातून पाणी गळते.जनावरांना ८ तासानंतर अतिसार होतो.जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.जनावारे बसून घेतात.गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.अति उष्णतेमुळे जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.

उपचार काय करावेत?

जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धूवुन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे व हलके पाचक गुळमिश्रित खादय दयावे.जनावरांच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.जनावरास नियमित व वारंवार सर्वसाधारणतः ३-४ वेळेस भरपूर थंड पाणी पाजावे.उष्माघात झालेल्या जनावरांना कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही. यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अती प्रखर किरणाचा संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जी.आय.सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठयात जास्त जनावरांना एकत्र डांबून गर्दी केल्यास उष्माघात चा त्रास होऊ शकतो म्हणून त्यावर ऊसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.

उन्हाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन

उन्हाळ्यात शेळ्यांचे पाणी व्यवस्थापन सर्वसाधारणतः शेळ्यांना पिण्याकरिता दररोज ५ ते ७ लिटर पाणी लागते. परंतु उन्हाळ्यात त्यांना १५ ते २० लिटर पाणी लागते. किंवा प्रति एक किलो शुष्क चाऱ्यामागे ४ लिटर पाणी देणे आवश्यक आहे. बंदिस्त शेळीपालनात पिण्याचे मुबलक स्वच्छ ताजे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे तापमान २० ते २४ अंश सेल्सीअस असावे. उन्हाळ्यात शेळ्यांना पिण्यासाठी माठ किंवा रांजणातील पाणी दिल्यास ते पाणी शेळ्या आवडीने पितात. शेळ्यांना बुळकांडी रोगप्रतिबंधक लस या महिन्यात (एप्रिलमध्ये) टोचुन घ्यावी.

कोंबड्यासाठी काय कराल? 

कोंबड्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे आच्छादित भिंत व छताच्या शेडमध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे शेडमध्ये हवा खेळती राहील अशा ठिकाणी व दिशेस शेडची बांधणी करावी. छताच्या पुढच्या बाजूला २४ इंच एवढ्या लांबीचे आच्छादन बसवावे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करावी व त्यास पांढऱ्या रंगाने रंगविणे फायदेशीर ठरते, तसेच छतावर वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, भाताचा कोंडा टाकावा व त्यास ओले ठेवावे.

सौजन्य ग्रामीण कृषी महोत्सव विभाग वेधशाळा,विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जिल्हा नाशिक

टॅग्स :शेतीहवामानतापमानउष्माघात