Join us

Agriculture News : जनावरांच्या शरीराचे तापमान वाढल्यास किती लीटरपर्यंत दुधात घट होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 21:15 IST

Agriculture News : सध्या वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या (Dairy Farming) आरोग्यावर परिणाम होत आहे.

धुळे : राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान ४० अंशांपेक्षा (Maharashtra Temperature) अधिक आहे. त्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही उन्हाचा फटका बसत आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाचा दर्जा खालावत आहे. दुसरीकडे पशुपालकांना (Dairy Milk) वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट सहन करावी लागत आहे.

शारीरिक तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास एक लिटरपर्यंत दुधात घट होऊ शकते, दुधाची प्रत घसरते, दुधातील फॅट, साखर, प्रथिने इत्यादीची पातळी खालावते. जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा (Heatstroke) त्रास होऊ शकतो. दुभती जनावरे जास्त दुग्धनिर्मिती करत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना दिला जात आहे. या प्रामुख्याने त्यांचे उन्हापासून संरक्षण करत असताना पुरेसे पाणी, गोठ्यात हवा खेळती राहील यादृष्टीने नियोजन करावे.

मागणी १० लाख, पुरवठा मात्र साडेसात लाख लिटरचाशेतीला जोडव्यवसाय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, सध्या वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार, मानवी आरोग्यासाठी दररोज ६०० मिली दूध आवश्यक असते.

जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता यानुसार जिल्ह्यात सरासरी किमान १० लाख लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र, उपलब्ध माहितीनुसार पुरवठा साडेसात ते आठ लाख लिटरपर्यंतच होत असल्याचे सांगण्यात आले. यात जिल्ह्यातील सहकारी, खासगी दूध संकलन केंद्रांतील दुधाची दररोजची आवक एकत्रित पाच लाख लिटर इतकी आहे तर अडीच ते तीन लाख लिटर पंर्किंगचे दूध बाहेरून येत असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय अतिरिक्त दूध शेजारच्या जिल्ह्यातून उपलब्ध होते. त्यातच उन्हामुळे दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसून येत आहे. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत तसेच गरोदर माता अशा सर्वांना दुधाची आवश्यकता दररोज असतेच. दुधातून कॅलशियम, प्रोटीन्स मीठ्या प्रमाणात मिळत असल्याने डॉक्टर देखील दूध पिण्याचा सल्ला देत असतात. यातूनच दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र पुरेस दूध उपलब्ध होत नसल्याने शेजारच्या जिल्ह्यातून आणावे लागत आहे.

वाढत्या तापमानामुळे मानवाप्रमाणेच जनावरांचेही आरोग्य बिघडत असते. याचा दूध उत्पन्नावर निश्चित परिणाम आणवतो. उन्हाळ्यात जनावरांना धारा, पुरेसे पाणी तसेच आवश्यक पोषक द्रवे देणे देखील गरजेचे आहे.- डॉ. अमित पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, धुळे 

टॅग्स :तापमानदुग्धव्यवसायदूधशेती क्षेत्रशेती