Join us

Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:53 PM

Dairy Business : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

Dairy Business :  कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे दुग्ध व्यवसाय (Dairy Business) व्यवस्थापन या विषयावर पशु विज्ञान विभाग अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात दुग्ध व्यवसायाची पंचसूत्री, दुधाळ जनावरांची /जातींची निवड, आहार व्यवस्थापन, गोठाबांधणी व व्यक्स्थापन यासह विविध गोष्टीची माहिती देण्यात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. पी पी शेळके यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी डॉ. पी पी शेळके यांनी शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई, देशी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. तसेच प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने, व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. तसेच चारा निर्मिती, दूध विक्री व्यवस्थापन, बाजारपेठ तसेच मानवी आहार दृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिन 300 मिलि दुधाची गरज भासते.वाढत्या लोकसंख्येला दुधाचे उत्पादन वाढणं फार गरजेचे आहे.इत्यादी  गोष्टीवर मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. कैलास एस गिते कार्यक्रम सहाय्यक (पशु विज्ञान ) यांनी दुग्ध व्यवसायाची पंचसूत्री, दुधाळ जनावरांची /जातींची निवड, आहार व्यवस्थापन, गोठाबांधणी व व्यक्स्थापन, आरोग्य व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन/विक्री व्यवस्थापन, दुधाळ जनावरातील रोग व त्याचे नियंत्रण, यामध्ये रोगप्रसाराचे मार्ग, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, परजीवीमुळे होणारे रोग, आरोग्यवस्थापन, नोंदी ठेवणे व लसीकरण नोंदीचे व्यवस्थापन, व्यवसायातील नोंदीचे महत्त्व व त्याचे प्रकार, तसेच आहारशास्त्र, आहार व्यवस्थापन यामध्ये दुधाळ जनावरांचे आहारातील अन्नद्रव्य, जीवनसत्वे, खनिज द्रव्य, खाद्याचे स्वरूप, आरोग्य व्यवस्थापन, जनावरांचे विमा सुरक्षा, तसेच गृह रचनेची सर्वसामान्य तत्वे, त्यासाठी लागणारी साधनसामग्री, इत्यादी गोष्टीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत  गिर गाई संगोपन केंद्र गोळी पेंड निर्मिती, अझोला युनिट इत्यादी ठिकाणी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

 रोहिणी शिंदे (गृह विज्ञान, विषय विशेषज्ञ) यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणे काळाची गरज आहे. तसेच ग्रामीण युवक/महिलांनी दुधापासून अनेक विविध पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. कैलास एस गिते (कार्यक्रम सहाय्यक, पशुविज्ञान) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल ओळंबे (विषय विशेषज्ञ फळभाजीपाला), प्रा.साईनाथ खरात (विशेषज्ञ मृदा शास्त्र) कार्यालयीन अधीक्षक विजय ठाकरे, मुगल, पी. पी. जाधव, गुलाबराव सूर्यवंशी, नरवाडे, शेख आफरीन यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठाहिंगोलीशेती क्षेत्र