Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > शेतकऱ्यांनो! जनावरांचं लसीकरण करून घ्या, इथं वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनो! जनावरांचं लसीकरण करून घ्या, इथं वाचा सविस्तर

Latest News Vaccination of animals from various diseases by Animal Husbandry Department | शेतकऱ्यांनो! जनावरांचं लसीकरण करून घ्या, इथं वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनो! जनावरांचं लसीकरण करून घ्या, इथं वाचा सविस्तर

सध्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना तोंडखुरी, पायखुरी व पीपीआर आजारांचे लसीकरण करण्यात येत आहे.

सध्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना तोंडखुरी, पायखुरी व पीपीआर आजारांचे लसीकरण करण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला : हिवाळ्यामध्ये जनावरांना विविध आजार जडतात. त्यामुळे जनावरांना आजार होऊ नये याकरिता तालुक्यातील जनावरांना सध्या पशुसंवर्धन विभागाकडून तोंडखुरी, पायखुरी व पीपीआर आजारांचे लसीकरण करण्यात येत आहे.

अकोला तालुक्यातील खामगाव तालुक्यात ७० हजार ७०१ गायी व म्हशी आहेत. तसेच १ लाख १५ हजार बकऱ्या व मेंढ्या आहेत. या जनावरांना हिवाळ्यात थंडी वाढल्याने तोंडखुरी, पायखुरी व पीपीआर आजार होण्याची शक्यता असते. हे आजार विषाणूजन्य आहेत. या आजारापासून जनावरांचा बचाव करण्याकरिता जनावरांची प्रतिकारकशक्ती वाढविण्याकरिता सध्या लसीकरण करण्यात येत आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये जनावरांना लसीकरण करण्याचे आदेश देण्यात येतात, त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडून खामगाव तालुक्यात लसीकरण करण्यात येत आहे.

दरम्यान पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर व कर्मचारी गावोगावी जाऊन जनावरांचे लसीकरण करीत आहेत. तसेच उन्हाळ्यामध्ये प्री मान्सून लसीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये घटसर्प, फऱ्या हे आजार जनावरांना होतात. हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यामुळे प्री मान्सून लसीकरण करण्यात येते. पशुपालकांनी लसीकरण करण्यासाठी आलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे.

१४ पशू रुग्णालयांद्वारे लसीकरण

खामगाव तालुक्यात १४ पशू रुग्णालये आहेत. यामध्ये श्रेणी १ दर्जाची ५ रुग्णालये असून, श्रेणी २ दर्जाची ८ रुग्णालये आहेत. तसेच खामगावमध्ये १ रुग्णालय आहे. या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी जनावरांचे लसीकरण करीत आहेत.

पशुपालकांना माहिती देण्याची गरज 

सध्या खामगाव तालुक्यातील पीपीआर व एफएमडीचे लसीकरण करण्यात येत आहे. जनावरांना आजारांची लागण होऊ नये याकरिता लसीकरण करण्यात येत आहे. पशुपालकांनी लसीकरणासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत पशुवैद्यकीय अधिकारी राजेश अवताडे यांनी व्यक्त केले. तर ऋषिकेश गिहे म्हणाले कि, पशुसंवर्धन विभागाने लसीकरण करण्यापूर्वी गावातील पशुपालकांना माहिती देण्याची गरज आहे. पिपळगाव राजा मोठे गाव आहे. अनेक नागरिकांच्या घरी जनावरे आहेत. काही पशुपालकांना लसीकरणाबाबत माहिती नसते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाबाबत आधीच पशुपालकांना माहिती देण्याची गरज आहे.

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News Vaccination of animals from various diseases by Animal Husbandry Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.