राज्यात तापमान प्रचंड वाढले असून ४२ ते ४५ अंशांपर्यंत गेले असून दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनावर परिणाम होत आहे. जनावरांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दुपारी जनावरांना धुवून काढण्यासह भरपूर पाणी पाजण्याची शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
तापमानात वाढ झाल्यामूळेदूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा.
दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.
काही ठिकाणी पावसाची शक्यता
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे.व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.