Join us

Livestock Infertility : पशु वंध्यत्व निर्मूलनविषयी शासनाचा कानाडोळा; राज्यातील 'इतके' टक्के गाई, म्हशी वंध्यत्वग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:30 AM

Livestock Infertility :

Livestock Infertility :

सुनील चरपे / नागपूर

राज्यात १ कोटी ३९ लाख गाई व ६५ हजार म्हशी आहेत. यातील ७० टक्के जनावरे ही वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासली आहेत. पशुपालक या गुरांच्या आरोग्याची नियमित तपासणी करीत नसल्याने पशुवैद्यकांना त्या गुरांवर वेळीच उपचार करता येत नाही. 

राज्य सरकारचे पशुवंधत्व निर्मूलन वरातीमागून घोडे ठरले आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख गाईच्या तसेच ७० टक्के म्हशींच्या वंशावळीची माहिती उपलब्ध नाही. 

ही जनावरे अनेक जातींचे मिश्र ब्रीड आहे. त्यांचे मूळ ब्रीड कळत नसल्याने त्यांच्यात अनुवंशिक सुधारणा करणे शक्य होत नाही. या सुधारणा प्रजननातून केल्या जात असल्या तरी या गुरांच्या वंध्यत्वामुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या आहे.

राज्यात २७ लाख संकरित जनावरे असून, त्यांच्यात ही समस्या नाही. या गुरांमध्ये त्यांच्या अनुवंश सुधारणा होत नसल्याने तसेच त्यात सातत्य नसल्याने दुधाचे उत्पादन वाढत नाही.

राज्यातील गुरांचे शुद्ध वंश

राज्यात गाईंचे सात शुद्ध वंश आहेत. यात खिलार, लाल कंधार, देवणी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला आणि नेमाडी यांचा समावेश आहे. म्हशींमध्ये नागपुरी, पंढरपुरी आणि मराठवाडी हे तीन शुद्ध वंश आहेत. अयोग्य व्यवस्थापन, अपुरा आहार व पोषण आणि सततचा ताण यामुळे जनावरे प्रजनन चक्रापासून दूर असतात व ती वंध्यत्वाला बळी पडतात.

सामूहिक प्रयत्न गरजेचे

● गुरांच्या वंध्यत्व निर्मूलनासाठी पशुपालक व पदवीधर पशुवैद्यक यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोबतच गुरांची दर महिन्यात किमान एकदा आरोग्य, प्रजनन व निरोगी गर्भाशय तपासणी करणे आवश्यक आहे.

● गर्भाशयाच्या दाहासाठी माजाचा बळस प्रयोगशाळेत तपासणी करून योग्य उपचार कोणता, याची पडताळणी गरजेचे आहे.

● राज्यात किती प्रयोगशाळेत अशा प्रकारची पडताळणी केली जाते, रत्यासाठी किती पशुपालक व पशुवैद्यक किती पुढाकार घेतात? या सुविधांच्या निर्मितीसाठी पशुपालक व राज्य सरकार गंभीर नाहीत.

टॅग्स :शेती क्षेत्रप्राण्यांवरील अत्याचारदुग्धव्यवसायशेतकरीशेतीनागपूरमहाराष्ट्र