जळगाव राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातले असून राज्यात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान ४,४०६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर व मराठवाड्याला बसला आहे. 'लम्पी'मुळे मृत्यू पावलेल्या जनावरांमध्ये वासरांसह गायींचा सर्वाधिक समावेश आहे.
राज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. म्हशीला हा रोग होत नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. त्यामुळे सध्या राज्यातील अहमदनगर, जळगावसह काही जिल्ह्यातील बैल बाजार बंद करण्यात आले आहेत. राज्यात यंदा १ एप्रिल ते १ सप्टेंबरदरम्यान ५२ हजार १४९ जनावरे संक्रमित झाली आहेत.
वासरांचा सर्वाधिक मृत्यूराज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे. कोल्हापूरमध्ये ३९३ गायींचा आणि नांदेडमध्ये २१२ बैलांचा मृत्यू झाला आहे.
अशी मिळणार मदत- दुधाळ जनावरांमध्ये गाय व म्हशींचा समावेश आहे. प्रति पशुधन ३० हजार रुपये, प्रति बॅल २५ हजार रुपये, वासरांसाठी १६ हजार रुपयांप्रमाणे पशुपालकांना अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.- पशुपालकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी जि.प. सीईओच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय जनावरांचा बळी कोल्हापूर- ६९०, नांदेड- ५५७, सोलापूर- ५५१, परभणी- ५२२, बीड- ३७७, लातूर- ३६२, सांगली- २७७, अहमदनगर- १८५, हिंगोली- १४०, जळगाव- १४४, सिंधुदुर्ग- ८०, नागपूर- ७९, छ. संभाजीनगर- ७३, धाराशिव- ७१, चंद्रपूर- ५४, जालना ५१, नाशिक- ४२, वर्धा- २७, रत्नागिरी- २४, सातारा- १६, वाशिम - १३, नंदुरबार- १०, धुळे- ०५, अमरावती- ०३, भंडारा - ०२, रायगड- ०१, अकोला- ०१, बुलढाणा- ०१