Join us

जनावरांना 'या' गोष्टी खाऊ घाला; दुधातील फॅट, डिग्री ८ दिवसांत वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 8:53 PM

डेअरीला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाचा दर हा फॅट आणि डिग्रीवर ठरवला जातो.

राज्यातील बहुतांश शेतकरी दूध उत्पादन करतात. सध्या दुधाचे दर केवळ २४ ते २६ रूपयांवर येऊन ठेपले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नसल्याचे चित्र आहे. तर अनेक शेतकरी घरगुती किंवा ठराविक ग्राहकांना दूध विक्री करतात. ग्राहकांचाही उत्पाकदावर विश्वास असल्यामुळे ते शेतकऱ्यांना चांगला दर देतात पण प्रत्येक दूध उत्पादकाला असे ग्राहक मिळत नाहीत. 

दरम्यान, डेअरीला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाचा दर हा फॅट आणि डिग्रीवर ठरवला जातो. डिग्री आणि फॅट कमी लागले तर तुलनेने दुधाचा दरही कमी होतो. त्यामुळे फॅट आणि डिग्री वाढीवर शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर अनेक शेतकरी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा चाऱ्यामध्ये, खुराकामध्ये बदल करून डिग्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. 

पण आपण आपल्या घरातील काही गोष्टी वापरून फॅट आणि डिग्री वाढवू शकतो हे आपल्याला माहिती आहे का? पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार डॉ. प्रशांत योगी यांनी यासंदर्भातील माहिती सांगितली असून प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या काही गोष्टी वापरल्या तर आपण गायींच्या किंवा म्हशीच्या दुधातील फॅट आणि डिग्रीची मात्रा वाढवू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे.

काय आहे घरगुती उपाय?गायीला किंवा म्हशीला खाण्याचा सोडा, काळा गूळ, खडे मीठ आणि चांगल्या दर्जाचे मिनरल मिक्स्चर मिक्स करून चाऱ्यात देणे. यानंतर गायीच्या दुधाचे फॅट आणि डिग्री वाढते आणि दर चांगला मिळतो. हा उपाय केल्यानंतर ४ ते ८ दिवसांत आपल्याला दुधात फरक दिसेल असा दावाही डॉ. प्रशांत योगी यांनी केलाय.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसायगाय