Join us

Dudh Anudan : १२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:53 IST

Milk Anudan : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्याअंतर्गत दूध उत्पादकांच्या थेट खात्यात अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर :  राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.

त्याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या (Milk Producer) खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपयांचे अनुदान जमा झाले आहे, असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ यांनी सांगितले.

या योजनेची जिल्हास्तरीय पडताळणी संबंधित जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येते.

या योजनेच्या प्रथम टप्प्यात अनुदान (Anudan) योजनेत सुरुवातीला जिल्ह्यातील  सहभागी १२ प्रकल्पांमार्फत लाभार्थी दूध उत्पादक ४ हजार ३८१ शेतकऱ्यांच्या एकूण ९ लक्ष ४३ हजार लिटर अनुदान पात्र दुधास ४ कोटी ५२ लक्ष रुपये इतके अनुदान प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वर्ग केले.

दुसऱ्या टप्प्यात सहभागी २९ प्रकल्पांमार्फत एकूण सहभागी पात्र १४ हजार १७८ लाभार्थी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्त ३ कोटी ६१ लक्ष लिटर दुधांपैकी आत्तापर्यंत एकूण ७ हजार ७८६ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या २ कोटी १४ लाख लिटर दुधास १० कोटी ५६ लाख रुपये अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली, तर उर्वरित ६ हजार ३९२ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे १ कोटी ४६ लाख लिटर दुधाचे अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.

हे ही वाचा सविस्तर : हे ही वाचा सविस्तर : Global Warming : हे काय? पशुधनामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग' वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रदूधदुग्धव्यवसायदूध पुरवठासरकारी योजनाकृषी योजना