Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

Milk business means 'calf is bigger than buffalo' Increase in the price of fodder and feed | Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

Dudh Vyavsay : दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' चारा पशुखाद्याच्या दरात वाढ

दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूध व्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही.

दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूध व्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

देवराष्ट्रे : दुधापेक्षा पशुखाद्य व चारा महाग झाल्यामुळे दूधव्यवसायाचा नुसता आर्थिक फुगवटा निर्माण होतो. मात्र, प्रत्यक्ष दूध उत्पादकांच्या जवळ काहीच उरत नाही.

गेल्या दहा वर्षांत दूध दरात चार टक्के वाढ झाली असून, पशुखाद्य दरात मात्र २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दूध व्यवसाय म्हणजे 'म्हशीपेक्षा रेडकू मोठे' असे म्हणण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

दूध दराचे धोरण हे आंतरराष्ट्रीय दूध पावडरच्या भरवशावर अवलंबून असते. त्यामुळे दुधाचे दर कधी वाढतील व कधी पडतील याचा अंदाज भल्याभल्यांना सांगता येत नाही. मात्र, दराच्या कमी जास्त वाढीमुळे दूध उत्पादकांची मात्र भरड होते.

उत्पादन खर्च जास्त व दुधाला मिळणारा दर कमी यामुळे दूध व्यवसाय नफ्यावर न चालता तोट्यात आहे. सध्या गाय दुधाचा दर प्रति लिटर ३० रुपयांच्या घरात गेला असला तरी पशुखाद्य मात्र ते ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत गेले आहे.

दूध संघांची पॅकिंग विक्री किंमत
गाय दूध प्रति लिटर विक्री ५२ ते ५६ रुपये तर म्हैस दूध प्रति लिटर विक्री ६६ ते ७५ रुपये आहे.

पशुखाद्याचे दर

पशुखाद्यसध्याचे दर१० वर्षांपूर्वीचे दर
सरकी३३ रु. किलो२० रु. किलो
गोळी पेंड३५ रु. किलो२२ रु. किलो
गहू भूसा२८ रु. किलो१७ रु. किलो
मका चुणी३२ रु. किलो१५ रु. किलो
शेंगदाणा पेंड५० रु. किलो३२ रु. किलो
उडीद काळना२५ रु. किलो१२ रु. किलो
लहान वासरांचे खाद्य३७ रु. किलो२२ रु. किलो
कडबा कुट्टी१३ रु. किलो५ रु. किलो

अधिक वाचा: गाई व म्हैशीतील लाल लघवीचा आजार कशामुळे होतो? काय कराल उपाय?

Web Title: Milk business means 'calf is bigger than buffalo' Increase in the price of fodder and feed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.