राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्य सरकारने दुधाळ गाय-म्हैस वाटप योजना सुरू केली असून दारिद्र्यरेषेखालील अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
गाईचे शेण, लाल मातीपासून बनविलेल्या गणरायाला परदेशात पसंती
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला २ दुधाळ देशी/ २ संकरित गाई किंवा दोन म्हशींचा एक गट 50 टक्के अनुदानावर देण्यात येतो. तर अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांमध्ये आता दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ही समावेश करण्यात आला आहे. याबाबत 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान
लाभार्थी निवडीचे निकष काय?
• दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
• अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
• अल्पभूधारक शेतकरी (एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक)
• सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
• महिला बचत गटातील लाभार्थी
रब्बी हंगामासाठी पिकांची निवड कशी कराल?
- शासकीय अनुदाना व्यतिरिक्त ची उर्वरित 50 टक्के रक्कम तसेच इतर प्रवर्गांसाठी असणारी 25% रक्कम स्वतः किंवा बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणूक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देण्यात येणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- या योजनेमध्ये प्रतिदिन दहा ते बारा लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एचएफ, जर्सी या संकरित गाई, प्रतिदिन आठ ते दहा लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी,राठी, थारपारकर, प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी लाल कंधारी, देवळाऊ व डांगी गाई तसेच मुरा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येणार आहेत.
शेळीपालनात फायदा मिळवायचाय? या आहेत खास तुमच्यासाठी ‘पाच टीप्स’
कुठे कराल अर्ज?
या योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा तपशील https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याला गुगल प्ले स्टोअर वरील AH-MAHABMS या मोबाईल ॲप वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.