Join us

Milk Diwali Bonus : दूध उत्पादकांना दिवाळी भेट; राज्यातील 'या' दूध संघाचा रिबेटसह बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 9:54 AM

दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Milk Producer Farmer) दिवाळी (Diwali) गोड करण्यासाठी विनाकपात रिबेट आणि कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्याची घोषणा राजारामबापू दूध संघाचे (Rajarambapu dudh sangh) अध्यक्ष नेताजीराव पाटील यांनी केली. रिबेट आणि बोनसची १७ कोटी ५० लाखांची रक्कम लवकरच वर्ग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इस्लामपूर : राजारामबापू दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विनाकपात रिबेट आणि कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांनी केली. रिबेट आणि बोनसची १७ कोटी ५० लाखांची रक्कम लवकरच वर्ग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, प्राथमिक दूध संस्थांच्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर सव्वादोन रुपये व गाय दुधास एक रुपयांचा दुध दर फरक देणार आहे. तसेच सेंटरधारकांच्या दूध उत्पादकांना २ रुपये १५ पैसे व ९० पैसे प्रतिलिटर म्हैस व गायीच्या दुधाला देणार आहोत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे.

प्रशासकीय खर्च कमी करताना उत्पादक सभासदांना केंद्रबिंदू मानून संघाच्या आर्थिक उलाढालीतील ८३ टक्के रक्कम दूध उत्पादकांना परताव्याच्या स्वरूपात देत आहोत. संघाची वार्षिक उलाढाल ४५० कोटी रुपयांची आहे.

पाटील म्हणाले, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूधदर फरक, प्राथमिक दूध संस्थांच्या विकास ठेवींवरील व्याज, लाभांश, अनामत रक्कम, दुधाचे १० दिवसांचे बिल आणि कर्मचाऱ्यांचा बोनस यासाठी संघाकडून १७ कोटी ५० लाख रुपये दिले जाणार आहेत. उपाध्यक्ष शशिकांत पाटील म्हणाले, दसऱ्यानिमित्त सभासदांना ५ हजार ८७४ किलो श्रीखंड वाटप केले. दिवाळीत ५ हजार ४१० किलो तूप भेट देणार आहोत. सभासदांना ५२ लाख रुपयांच्या दुग्ध पदार्थांची भेट दिली जाते.

यावेळी संचालक अनिल खरात, दिलीप खांबे, कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. ढोपे, कार्यालयीन अधिक्षक लालासाहेब साळुंखे उपस्थित होते.

हेही वाचा : दुचाकीवर दररोज ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करत शेतकऱ्यांच्या पशुधनास जीवदान देणारी महिला पशुवैद्यक

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीदूधदिवाळी 2024शेती क्षेत्रशेती