Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Milk Fever in Cattle : गाई-म्हशीतील दुग्धज्वर आजार कशामुळे? काय कराल उपाययोजना

Milk Fever in Cattle : गाई-म्हशीतील दुग्धज्वर आजार कशामुळे? काय कराल उपाययोजना

Milk Fever in Cattle : What causes milk fever in cows and buffaloes? What measures should be taken? | Milk Fever in Cattle : गाई-म्हशीतील दुग्धज्वर आजार कशामुळे? काय कराल उपाययोजना

Milk Fever in Cattle : गाई-म्हशीतील दुग्धज्वर आजार कशामुळे? काय कराल उपाययोजना

Milk Fever in Cow गाई म्हशी वेळेला व्याल्यानंतर विशेषतः ज्यादा दूध देणाऱ्या गाई म्हशी अनेक वेळा पहाटे सकाळी गोठ्यात आडव्या पडलेल्या आढळून येतात. अनेक वेळा त्यांना उठता येत नाही.

Milk Fever in Cow गाई म्हशी वेळेला व्याल्यानंतर विशेषतः ज्यादा दूध देणाऱ्या गाई म्हशी अनेक वेळा पहाटे सकाळी गोठ्यात आडव्या पडलेल्या आढळून येतात. अनेक वेळा त्यांना उठता येत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

गाई म्हशी वेळेला व्याल्यानंतर विशेषतः ज्यादा दूध देणाऱ्या गाई म्हशी अनेक वेळा पहाटे सकाळी गोठ्यात आडव्या पडलेल्या आढळून येतात. अनेक वेळा त्यांना उठता येत नाही.

अंग गार पडून श्वासोच्छवास मंद झालेला असतो. सकाळी पहाटे उठल्यानंतर ज्यावेळी पशुपालक गोठ्यात जातो त्यावेळी असे दृश्य पाहिल्यानंतर त्याची भीतीने गाळन उडते.

जर रात्री केव्हा तरी अशा प्रकारे गाय म्हैस आडवी पडली असेल, खूप वेळ झाला असेल तर जनावर बेशुद्ध पडून मृत्युमुखी देखील पडू शकते. हा एक चयापचय संबंधित रोग असून त्यात मिल्क फीवर किंवा दुधाचा ताप, दुग्धज्वर असे म्हणतात.

यामध्ये ज्वर, ताप असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष ताप, ज्वर न वाढता शरीर थंडगार पडलेले असते हे लक्षात घ्या. साधारणपणे ज्यादा दूध देणाऱ्या गाई म्हशींमध्ये हा रोग आढळून येतो.

व्याल्यानंतर साधारण २४ ते ७२ तासात असा प्रकार आढळून येतो. साधारण तीन टप्प्यात याची लक्षणे आढळून येतात.

आजार कसा ओळखावा?
-
पहिल्या टप्प्यात जनावराची भूक मंदावते. जनावर मलुल दिसते.
- पायावरील भार वारंवार बदलत राहते. मागील पायात ताठरपणा येतो.
- शरीराचे तापमान हे नॉर्मल असते.
- दुसऱ्या टप्प्यात जनावर छाती टेकून बसते. इंग्रजी एस आकारात मान वळवून पोटात घेते.
- हृदयाचे ठोके वाढलेले असतात. नाकपुड्या कोरड्या पडतात.
- पय, शेपूट, कबरेचा भाग हा थंड लागतो.
- तापमान हे ९७ ते ९८ डिग्री फॅरेनाईट पर्यंत खाली येते.
- प्रकाशास डोळे प्रतिसाद देत नाहीत.
- आतड्याची हालचाल मंदावल्यामुळे शेण टाकता येत नाही. गुदद्वारात अडकून पडलेले आढळते.
- तिसऱ्या टप्प्यात मात्र जनावर पूर्णपणे आडवे होते. पोट फुगते. बेशुद्ध अवस्थेत जाते.
त्यामुळे या सर्व लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून व्यालेल्या जनावरावर पशुपालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

उपाययोजना
१) हा दुधाचा ताप आपल्याला रोखता येऊ शकतो.
२) ज्यावेळी अशी ज्यादा दूध देणारी जनावरे आटलेली असतात. त्या काळात कॅल्शियम, फॉस्फरस युक्त आहार देणे अत्यंत आवश्यक आहे.
३) कोणत्याही परिस्थितीत दूध बंद झाले म्हणून समतोल आहाराकडे दुर्लक्ष करू नये.
४) नियमित खनिज मिश्रणे आहारात वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
५) व्याल्यानंतर दोन-तीन वेळेला थोडे थोडे दूध काढून देखील हा प्रकार रोखता येऊ शकतो. पण पुन्हा दगडी होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
६) बाजारात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या कॅल्शियम, फॉस्फरस युक्त ‘जेल’ स्वरूपातील उत्पादने वापरून देखील दूध ज्वर आपण रोखू शकतो.
७) ‘ड’ जीवनसत्वाची इंजेक्शने देखील उपयोगी ठरतात.
८) सोबत गाभण काळात हलकासा व्यायाम देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

अशावेळी घाबरून न जाता तात्काळ तज्ञ पशुवैद्यकांना बोलवून घ्यावे. व्यायला झालेल्या जनावरावर बारीक लक्ष ठेवून त्याची कल्पना आपल्या पशुवैद्यकांना देऊन ठेवावी. जमल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कॅल्शियम सलाईनचा एक दोन बाटल्या खरेदी करून ठेवाव्यात.

व्याल्यानंतर काढलेल्या चीकात भरपूर कॅल्शियम असते म्हणून कोणत्याही परिस्थितीत सदर चीक गाईला किंवा म्हशीला पाजू नये. अशाप्रकारे हा आजार आपण निश्चित टाळू शकतो.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: व्याल्यानंतर ९० दिवसात म्हैशी पुन्हा गाभण राहण्यासाठी कसे कराल व्यवस्थापन; वाचा सविस्तर

Web Title: Milk Fever in Cattle : What causes milk fever in cows and buffaloes? What measures should be taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.