Join us

सहकारातून विदर्भात दुग्धोत्पादनाचा विकास करणार : सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:08 IST

केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून 'सहकार से समृद्धी' या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

नागपूर : पूर्वी कृषी विभागात समाविष्ट असलेल्या सहकार विभागाची आता स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत विदर्भातील दुग्धोत्पादनालाMilk Production चालना देण्याची गरज आहे.

यासाठी विशेष प्रयत्न सहकारCooperation चळवळीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी येथे सांगितले.

केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून 'सहकार से समृद्धी' या उपक्रमांतर्गत देशभरातील दहा हजार बहुउद्देशीय संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचा बुधवार (२५ डिसेंबर) रोजी शुभारंभ करण्यासाठी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवन येथून करण्यात आले.

यामध्यमातून विदर्भात दुग्धोत्पादनाला चालना मिळणार आहे. भविष्यात दुग्ध उत्पादकांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जाणार आहे, असेही भोयर यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहनिबंधक प्रवीणा वानखेडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांच्यासह सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सहकार चळवळीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या विभागाचा हा वारसा आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणात सहकारातून समृद्धी हा उपक्रमा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यावेळी म्हणाले.

हे ही वाचा सविस्तर : Dudh Anudan : बुलढाणा जिल्ह्यात ३७ हजार लीटर दूध संकलन; ८४८ जणांचे अनुदान रखडले!

टॅग्स :शेती क्षेत्रदूधदूध पुरवठाविदर्भ