Join us

Milk Subsidy : दुधाला ५ रुपयांचेच अनुदान मिळणार; सरकार ठाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 3:03 PM

Maharashtra Farmer Milk Protest :

Milk Producer Protest For Rates in Ahmednagar: राज्यभरात दूधाचे दर वाढवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असून या आंदोलनाची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे. सध्या दुधाचे दर २५ ते २७ रूपयांपर्यंत खाली आले आहेत. तर पशुखाद्य आणि इतर शेतीनिविष्ठांचे दर वाढले असताना दुधालाच दर कमी का मिळतो असा आर्त सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. 

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे हे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांनी दुधाच्या किटल्या रस्त्यावर टांगून आणि भर रस्त्यात दहीहंडी फोडून अनोखा निषेध व्यक्त केला आहे. आंदोलनामध्ये शेतकरी महिला, दूध उत्पादक शेतकरी आणि नेते सहभागी झाले आहेत. तर दुधाचे दर वाढवावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला  एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले यांनीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. (Milk Producer Farmer Protest In Maharashtra)

दुग्धविकास मंत्र्यांकडून नकारनुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रूपये प्रतिलीटरचे अनुदान जाहीर केले आहे. तर  दुधाला ४० रूपयांचा दर देता येणार नाही अशी स्पष्टोक्ती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे सरकार हे दर वाढवण्याऐवजी ५ रूपयांच्या अनुदानावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. या कारणांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढला असून उत्पादक शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

दूध भुकटीची आयात का?देशात २ लाख टन दुधाच्या भुकटीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती नॅशनल डेअरी असोशिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली. तर हा साठा उपलब्ध असताना १० हजार टन दूध भुकटी आयातीची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. त्यामुळे केंद्र सरकार दूध उत्पादकांच्या मानगुटीवर बसले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीअहमदनगर